घरदेश-विदेशपाच वर्षात ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठू: पंतप्रधान

पाच वर्षात ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठू: पंतप्रधान

Subscribe

सगळीकडे ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयाचीच चर्चा सुरू

नुकताच अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सगळीकडे भारताच्या ५ ट्रिलिअन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयाबाबत चर्चा होताना दिसत आहे. मात्र काहीजण भारताच्या क्षमतेवर संशय घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी येथे जाहीर सभेत बोलताना असे म्हटले की, जे लोक भारताच्या क्षमतेवर तसेच सामर्थ्य़ावर संशय घेताय त्यांना असं वाटतंय की भारत मोठी उंची गाठता येणे अशक्य आहे. त्यामुळेच आम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवल्याने सगळीकडे याविषयी चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

दहा वर्षांचे ध्येय गाठण्यासाठी पाऊल टाकण्याचा आत्मविश्वास

काल ५ जुलै रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात आम्ही ५ ट्रिलिअन डॉलरचे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम केले आहे. तसेच यासंदर्भातील निर्णयांची घोषणा देखील केली असून आगामी दहा वर्षांचे ध्येय गाठण्यासाठी पाऊल टाकण्याचा आत्मविश्वास दाखवला. त्यानुसार, येणाऱ्या पुढील पाच वर्षात नक्कीच ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठू, असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला.

देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलर करण्याचे ध्येय

तसेच, ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट करताना मोदींनी इंग्रजीतील size of the cake matters या म्हणीचा संदर्भ देत, जर केक मोठा असेल तर आपल्याला त्याचा तुकडाही मोठाच मिळेल. त्यामुळे आम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलर करण्याचे ध्येय ठेवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -