घरदेश-विदेशत्सुनामीग्रस्त इंडोनेशियाला भारताकडून मदत जाहीर

त्सुनामीग्रस्त इंडोनेशियाला भारताकडून मदत जाहीर

Subscribe

इंडोनेशियामध्ये आलेल्या भूकंप आणि त्सुनामीमुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली आहे. आता भारतानेही त्सुनामीग्रस्त इंडोनेशियाला मदत जाहीर केली आहे.

इंडोनेशियाला आलेल्या भूकंप आणि त्सुनामीमुळे मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्तहानी झाली असल्याने भारताने त्यांना मदत जाहीर केली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत सुरू असलेल्या भाषणामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांनी भारताकडून त्सुनामीग्रस्त इंडोनेशियाला मदत देणार असल्याची घोषणा केली.

- Advertisement -

त्सुनामी – भूकंपामुळे ४०० जणांचा मृत्यू

इंडोनेशियामध्ये आलेल्या भूकंप आणि त्सुनामीमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हा आकडा आता ४०० पर्यंत पोहोचला असून तब्बल ५४० लोकं यात जखमी झाले आहेत. तर शेकडो नागरीक अजूनही बेपत्ता आहेत. तेथील हॉस्पिटल्समध्ये जखमी आणि त्यांना पाहायला येणाऱ्यांची संख्या वाढली असून सर्व हॉस्पिटल्समध्ये त्यांची गर्दी झाली आहे. पालू आणि दोंगाला शहराला त्सुनामीचा तडाखा बसला असून काल भूकंपाचे झटके पालूपासून ७८ किलोमीटरच्या अंतरावर बसले होते.

- Advertisement -

हजारो घर झाली जमिनदोस्त

अमेरिका भूगर्भ यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, शुक्रवारी मध्य सुलावेसी येथील दोंगाल परिसरात आलेल्या भूकंपाची तीव्रता ७.५ इतकी होती. हा सर्वाधीक तीव्रतेचा भूकंप असल्याचे बोलले जाते. भूकंपानंतर पालू शहरातील हॉस्पिटल्समध्ये जखमीची संख्या इतकी वाढली आहे की काहींना हॉस्पिटलच्या बाहेर उघड्यावर उपचारासाठी ठेवण्यात आलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी सांगितले की, शहरातील बहुतांश भागामध्ये मदतकार्य सुरु असून अधिकच्या सुरक्षारक्षकांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपात हजारोंच्या संख्येने घरांचे आणि इमारतींचे नुकसान झाले आहे. यात एक ८० रुम असलेल्या हॉटेलचाही समावेश आहे. त्याशिवाय काही मस्जिद, शॉपिंग मॉल्स यादेखील जमिनदोस्त झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -