घरदेश-विदेशमहात्मा गांधींचा फोटो दारूच्या बाटलीवर; कंपनीने मागितली माफी

महात्मा गांधींचा फोटो दारूच्या बाटलीवर; कंपनीने मागितली माफी

Subscribe

या प्रकरणानंतर इस्त्राइल कंपनीने समस्त भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्याने माफी मागितली

इस्राइलमधील माका ब्रेवरी कंपनीने दारूच्या बाटलीवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटा लावल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान यासर्व प्रकाराबाबत इस्राइल कंपनीने भारतीयांची भावना दुखवल्या बाबत माफी मागितली आहे. इस्राइलमध्ये एका दारूच्या दुकानात बाटल्यांवर महात्मा गांधींचा फोटो आढळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यावर भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. या घटनेची माहिती मिळताच राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी नवी दिल्लीत निषेध केला होता. इतकेच नव्हे तर या संदर्भात कारवाई करण्याची मागणीही केली होती.

- Advertisement -

इस्राइलच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या दारू उत्पादनाची निर्मीती करण्यात आली होती. त्यामधील काही बाटल्यावर महात्मा गांधींचे छायाचित्र लावण्यात आल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रचंड राग व्यक्त केला होता.

या प्रकरणावर केरळच्या महात्मा गांधी नॅशनल फाउंडेशनचे चेअरमॅन एबी जे जोसने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली आहे. जोस यांनी रविवारी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनाही पत्र लिहीले. त्यांनी दारू कंपनी आणि त्याच्या मालकाविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणानंतर इस्त्राइल कंपनीने समस्त भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्याने माफी मागितली असून कंपनीने असे सांगितले की, आम्हीही महात्मा गांधी यांचा सन्मान करतो, बाटल्यांवर महात्मा गांधी यांचे चित्र लावल्याबद्दल आम्ही माफी मागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -