घरमहाराष्ट्रवासिंद जवळील अपघातात दोन तरूणांचा जागीच मृत्यू

वासिंद जवळील अपघातात दोन तरूणांचा जागीच मृत्यू

Subscribe

फुड एक्स्प्रेस हॉटेल जवळ त्यांची मोटार सायकल घसरल्याने ते रस्त्यावर पडले व त्याक्षणी पाठीमागून वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाखाली आल्याने जागीच ठार

मुंबई-नाशिक महामार्गावर असणाऱ्या वासिंद जवळील खातिवली येथे भीषण अपघात झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटार सायकलच्या झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री दहा वाजेच्या सुमारास झाला.

सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये शहापुर तालुक्यातील कानविंदे येथे राहणारे मिलिंद वेखंडे (३५) आणि सचिन दळवी (३३) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिलिंद वेखंडे हे सध्या कल्याण येथे वास्तव्य करित असून मिलिंद हे काल आपला मित्र सचिन दळवी याच्यासह आपल्या गावी कामानिमित्त आले होते.

- Advertisement -

कल्याण येथे रात्रीच्या वेळी परतत असताना मुंबई-नाशिक महामार्गावर वासिंद जवळील खातिवली येथील फुड एक्स्प्रेस हॉटेल जवळ हा अपघात झाला. फुड एक्स्प्रेस हॉटेल जवळ त्यांची मोटार सायकल घसरल्याने ते रस्त्यावर पडले व त्याक्षणी पाठीमागून वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाखाली आल्याने जागीच ठार झाले.

याबाबत वासिंद पोलिस स्थानकात अपघाताची गुन्हा नोंद केली असून पुढील तपास पो.नि.राजु वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -