घरट्रेंडिंगइस्रोची ऐतिहासिक कामगिरी, LVM-3-M2 चे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोची ऐतिहासिक कामगिरी, LVM-3-M2 चे यशस्वी प्रक्षेपण

Subscribe

श्रीहरी कोटा – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) ऐतिहासिक यश मिळाले आहे. इस्रोने रविवारी येथील अंतराळ केंद्रातून सर्वात वजनदार रॉकेट LVM-3-M2/OneWeb India-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. त्याचबरोबर, 36 ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रह यूके-आधारित ग्राहकासाठी लो ऑर्बिट (LEO) मध्ये ठेवण्यात आले. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतीय अंतराळ संस्थेचे हे मोठे यश आहे.

हेही वाचा – गुगलला 1,337 कोटींचा दंड, कॉम्पिटिशन कमीशन ऑफ इंडियाची कारवाई

- Advertisement -

NewSpace India Limited (NSIL), अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने लंडन-मुख्यालय असलेल्या नेटवर्क ऍक्सेस असोसिएटेड लिमिटेड (OneWeb) सोबत ISRO च्या LVM-3 वर OneWeb LEO उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी दोन प्रक्षेपण सेवा करारावर स्वाक्षरी केली आहे.

OneWeb ही एक खाजगी उपग्रह संप्रेषण कंपनी आहे ज्यामध्ये भारती एंटरप्रायझेस एक प्रमुख गुंतवणूकदार आणि भागधारक आहे. रविवारी, 24 तासांच्या काउंटडाउनच्या शेवटी येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून 43.5 मीटर उंच रॉकेट सकाळी 12.07 वाजता प्रक्षेपित करण्यात आले. या रॉकेटमध्ये आठ हजार किलोपर्यंतचे उपग्रह अवकाशात वाहून नेण्याची क्षमता आहे. महत्त्वाचं म्हणजे, मिशनमध्ये वनवेबच्या ५,७९६ किलो वजनाच्या ३६ उपग्रहांसह अंतराळात जाणारे हे पहिले भारतीय रॉकेट आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा, सर्वात कमी कार्यकाळाची नोंद

यशस्वी प्रक्षेपणामुळे, LVM-3 ला जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा क्षेत्रात विशेष ओळख मिळाली आहे. NSIL, अंतराळ विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने सांगितले की, NSIL द्वारे LVM-3 चे हे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण आहे. या प्रकल्पाची माहिती यापूर्वीच देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -