घरदेश-विदेशहल्ल्याचा धमाका मदरशांमधील मुलांच्या अजूनही कानी वाजतोय

हल्ल्याचा धमाका मदरशांमधील मुलांच्या अजूनही कानी वाजतोय

Subscribe

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर काही तासातच बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशांतून तेथील मुलांना पाकिस्तानी लष्कराने सुरक्षित स्थळी हलवले. इतकेच नव्हे तर या मदशांमधील मुलांनी एअर स्ट्राईकनंतरच्या घटनेची सविस्तर माहिती दिल्याचेही सांगितले जात आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकवरूनही देशात चांगलंच राजकारण तापलं. अनेकांनी या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले किंवा एअर स्ट्राईक झाला की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर काही तासातच बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशांतून तेथील मुलांना पाकिस्तानी लष्कराने सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर या मदशांमधील मुलांनी एअर स्ट्राईकनंतर घटनेची सविस्तर माहिती दिल्याचेही सांगितले जात आहे.

हल्ल्याच्या आवाजाने झोपेतून जागे झालो 

भारतीय वायू सेनेने २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारतीय वायू सेनेनं हा हल्ल्या करण्यापूर्वीच एक आठवडा अगोदर या मदरशांना पाकिस्तानी सैन्याने सुरक्षा दिली होती, असे येथील लहान मुलाने सांगितले. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानकडून या मदरशांना संरक्षण पुरवण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. २६ फेब्रवारी रोजी मध्यरात्री मोठा आवाज झाला. या आवाजाने आम्ही झोपेतून जागे झालो. हा हल्ला आमच्या मदरशापासून जवळच झाला होता. त्यानंतर सकाळीच पाकिस्तानी सैन्याने आम्हाला एकत्र घेऊन एका सुरक्षित स्थळी नेले आणि काही दिवसांनी आमच्या घरी नेऊन साडले, असेही या चिमुकल्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मुलांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले 

भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यावेळी त्या भागात ३०० मोबाईल अ‍ॅक्टिव्ह होते, अशी आकडेवारी समोर आली होती. विशेष म्हणजे हे फोन अ‍ॅक्टिव्ह असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या तांत्रिक विभागाला मिळाली होती. एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची चर्चा सुरू असताना ही आकडेवारी पुढे आली. त्यानंतर, आता भारतीय वायू सेनेनं लक्ष्य केलेल्या तळांवर असलेल्या मदरशातील मुलांना हल्ल्यानंतर काही तासांतच सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बालाकोट येथील तलिम-उल-कुराण या जैश-ए-मोहम्मदच्या मदरशांतील काही मुलांना लगेचच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यानंतर, काही दिवसांनी त्यांना त्यांच्या घरी ठेवण्यात आल्याची माहिती, या मुलांच्या नातेवाईकांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -