घरमहाराष्ट्रअभिनंदन यांच्या समर्थनार्थ 'रास्ता रोको'...

अभिनंदन यांच्या समर्थनार्थ ‘रास्ता रोको’…

Subscribe

विंग कमांडर अभिनंदन यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या या व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.

भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप परतल्यामुळे देशभरात जोशाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे अभिनंदन यांचं कौतुक करण्यासाठी एका युवकाने सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. हा तरूण  येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील असून, अभिनंदन यांचं अभिनंदन करण्यासाठी त्याने टाकलेल्या पोस्टवर एका समाजकंटकाने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने अंदरसूल येथील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या गावातील काही लोकांनी चौफुली येथे थेट रास्ता रोको केल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अचानक करण्यात आलेल्या या रास्ता-रोकोमुळे वाहतूक करणारे लोक तसंच स्थानिक नागरिक गोंधळून गेले होते. तसंच यामुळे रस्त्यावर काहीवेळासाठी ट्रॅफिकचाही खोळंबा झाला होता.


वाचा: एअर इंडियाच्या प्रत्येक प्रवासात आता ‘जय हिंद’

कालांतराने तेथील परिस्थीती चिघळत असल्याची महिती नागरिकांकडून स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यामुळे स्थानिक पोलिस संपूर्ण फौजफाट्यासह चौफुली येथे पोहचले आणि रास्ता रोको करणाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या हत्सक्षेपामुळे परिस्थीती लगेचच नियंत्रणात आली आणि रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली. दरम्यान, मनमाड विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रागसुधा यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी अंदरसुल येथे जाऊन आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधला. दरम्यान, अंदरसुल येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तसंच सर्व पक्षीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी त्या व्यक्तीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. देशाची शान असलेल्या ‘अभिनंदन’ यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या या व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, सध्या पोलिसांनी सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -