घरताज्या घडामोडी'शाहीन बाग.. खेल खत्म'; गोळी झाडण्यापूर्वी तो होता फेसबुकवर Live

‘शाहीन बाग.. खेल खत्म’; गोळी झाडण्यापूर्वी तो होता फेसबुकवर Live

Subscribe

फेसबुकवर शाहीन बाग खेल खत्म अशी पोस्ट टाकून आरोपी गोळीबार करण्यासाठी निघाला होता. मोर्चात त्याने दोनवेळा फेसबुक लाईव्ह केले.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात आज दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ ते राजघाट पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मोर्चा सुरु होण्याआधी एका माथेफिरू तरुणाने मोर्चावर गोळीबार केला. या तरुणाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार करण्यापूर्वी या युवकाने फेसबुकवर पोस्ट टाकून आपला उद्देश जाहीर केला होता. तसेच तो दोन वेळा फेसबुकव लाईव्ह देखील आला होता.

rambhakt gopal post
रामभक्त गोपाल याचे फेसबुक लाईव्ह

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळी चालवणाऱ्या युवकाचे नाव राम भक्त गोपाल असून तो उत्तर प्रदेशमधील नोयडा येथे राहणारा आहे. त्याने सकाळीच शाहीन बाग.. खेल खत्म अशी पोस्ट टाकली होती. त्यानंतर ज्या ठिकाणी मोर्चा काढला जात होता, तिथे जाऊन गोळीबार केला. या गोळीबारात मोर्चातील एक तरुण जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक केल्यानंतर मोर्चा पुन्हा एकदा राजघाटच्या दिशेने चालू लागला होता.

- Advertisement -

rambhakt gopal post

घटनास्थळी उपस्थित असलेल्या डीसीपी चिन्मय बिश्वाल यांनी सांगितले की, रामभक्तने गर्दीच्या दिशेने बंदूक काढून गोळी झाडायला सुरुवात केली होती. त्यानंतर काही वेळातच त्याच्यावर झडप घालून त्याला पकडण्यात आले. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे. मोर्चातील शादाब नावाच्या तरुणाला गोळी लागली असून तो जामिया मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे. सध्या जखमी तरुणावर उपचार केले जात आहेत.

jamia miliya youth
गोळीबारात जखमी झालेला तरुण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -