घरमहाराष्ट्रजागतिक कुष्ठरोग निवारण दिन - राज्यात १३ हजार ८१५ कुष्ठरुग्ण

जागतिक कुष्ठरोग निवारण दिन – राज्यात १३ हजार ८१५ कुष्ठरुग्ण

Subscribe

कुष्ठरोगाच्या ६ हजार १०० नव्या रुग्णांची नोंद

महारोग म्हणून ओळखला जाणारा कुष्ठरोग हा आता अखेरची वाटचाल करत आहे. ३० जानेवारी हा दिवस जागतिक कुष्ठरोग निवारण दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ हे ब्रीदवाक्य ठेवण्यात आले असून त्यानुसार, कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी राज्यात प्रयत्न केले जात आहेत. ३० ते १३ फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

कुष्ठरोगाचे राज्यात सध्या १३ हजार ८१५ कुष्ठरुग्ण उपचार घेत आहेत. दरवर्षी, १६ सप्टेंबरला दोन आठवड्यांचे कुष्ठरुग्ण शोध मोहिम घेतली जाते. गेल्या वर्षी जवळपास साडेसात कोटी नागरिकांची या मोहिमेंतर्गत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नव्याने ६ हजार १०० रुग्ण आढळून आले. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांतील रुग्णांचा तर पालघर, ठाणे, उस्मानाबाद, लातूरही रुग्ण आढळून आले आहे.

- Advertisement -

जनजागृतीपर वेगवेगळे कार्यक्रम –

दरम्यान, पंधरवड्यानिमित्त ग्रामसभा घेण्यात येत असून त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाचे वाचन केले जात आहे. सरपंच अथवा गावातील मान्यवर यावेळी कुष्ठरोगाबाबत मार्गदर्शन करतील. गावातील ज्येष्ठ व्यक्ती महात्मा गांधीजींची वेषभूषा करुन त्यामार्फत कुष्ठरोग निर्मुलन विषयक संदेश दिला जाणार आहे. कुष्ठरोगाबाबत शंकानिरसन यावेळी केले जाईल. गावात कुष्ठरोगी असल्यास त्यामार्फत ग्रामसभेत आभार प्रदर्शन करण्यात येईल. जनजागृती कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पथनाट्य, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींच्या माध्यमातून कुष्ठरोग निर्मूलनासाठी संदेश दिला जाईल. स्पर्श अभियान राबवण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका समन्वय समिती करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनामार्फत कुष्ठरोग निर्मूलन मोहिम ऑक्टोबर २०२० पर्यंत राबवण्यात येत आहे. दरवर्षी ३० जानेवारीला कुष्ठरोग निवारण दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त जाणीवजागृतीसोबतच कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती समाजातील विविध घटकांना देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -