घरताज्या घडामोडीJammu and Kashmir: पुलवामात तरुणांना दहशतवादी बनवण्याच्या मॉड्युलचा पदार्फाश: दहशतवाद्यांचे ६ सहकारी...

Jammu and Kashmir: पुलवामात तरुणांना दहशतवादी बनवण्याच्या मॉड्युलचा पदार्फाश: दहशतवाद्यांचे ६ सहकारी गजाआड

Subscribe

जम्मू-काश्मीर पोलिसांनी काश्मिरमधील लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) मॉड्यूलचा पदार्फाश करत दहशतवाद्यांचा ६ सहकाऱ्यांना अटक केली आहे. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले की, दक्षिण काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात एलईटी मॉड्यूलचा पदार्फाश करत दहशतवाद्यांच्या ६ सहकाऱ्यांना अटक केली आहे.

सगळ्यांची पटली ओळख

पोलिसांच्या माहितीनुसार, रौफ अहमद लोन, आकिब मकबूल भट, जावेद अहमद डार, अर्शिद अहमद मीर, रमीज राजा आणि सजाद अहमद डार असे या दहशतवाद्यांना सहाकार्य करणाऱ्या सहा जणांची नावे आहेत. हे सर्व पुलावामातील विविध गावात राहणारे आहेत. सुरुवातीच्या तपासात समजले आहे की, अटक केलेल्या दहशतावाद्यांचे सहकारी तरुणांना दहशतवादी म्हणून काम करण्यास प्रवृत्त करत होते.

- Advertisement -

दहशतवाद्यांचा कमांडर रियाज अहमद डार ऊर्फ खालिद ऊर्फ शिराजसाठी हे लोकं काम करत होते. शिराज पुलवामाच्या सेदरगुंड काकापोरा रहिवाशी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबासाठी काम करत होता, त्यांच्यासोबत सतत संपर्कात होता. याप्रकरणी काकापोरा पोलिस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.


हेही वाचा – Russia Ukraine Crisis: रशियाचे युक्रेनवर सहा मिसाईल हल्ले; स्फोटाच्या आवाजाने उडाला गोंधळ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -