घरदेश-विदेशमुंबईचे आमोद नागपुरे बनले 'शेर-ए-काश्मीर'

मुंबईचे आमोद नागपुरे बनले ‘शेर-ए-काश्मीर’

Subscribe

मुंबईचे आमोद नागपुरे यांना जम्मू-काश्मीर राज्य सरकारने 'शेर-ए-काश्मीर' हे शौर्यपदक देण्याचे जाहीर केले आहे. आमोद यांनी काश्मीर भाग्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

काश्मीर हा मुद्दा देशासाठी फार संवेदनशील असा आहे. काश्मीरवर सतत होणारे दहशतवादी हल्ले हे देशाची भळभळती अशी जखम बनले आहे. एक जखम भरुन निघत नाही, तेवढ्यात दुसरी जखमी होते किंवा त्याच जखमेवर घाला घातला जातो. त्यामुळे या जखमेच्या दुखण्याची तीव्रता अधिक वाढते. दहशतवाद्यांकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे काश्मीरचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तेथील परिस्थिती ही धोक्याची आहे. पंरतु, तरीही हा धोका पत्करायचं साहस मुंबईच्या आमोद नागपुरे यांनी केलं आणि आज त्यांच्या या धाडसामुळे त्यांनी केलेल्या कामगिरीतून त्यांना ‘शेर-ए-काश्मीर’ हे शौर्यपदक जाहीर झाले आहे.

आमोद नागपुरे यांची अभिमानास्पद कामगिरी

१७ नोव्हेंबर २०१७ रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवानांना कंठस्नान घालण्यात आमोद यांना यश आले होते. त्याचबरोबर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचे साहस आमोद यांनी केले होते. त्यांच्या या कामगिरीमुळे जम्मू-काश्मीर सरकारने त्यांना ‘शेर-ए-काश्मीर’ हे शौर्यपदक जाहीर केले आहे.

- Advertisement -

कोण आहेत आमोद नागपुरे?

आमोद नागपुरे हे मुंबईचे आहेत. सध्या ते जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती आणि पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले होते. ते आयपीएस अधिकार म्हणून रुझू झाले होते. २०१३ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत आमोद यांना २५३ वा क्रमांक आला होता. यानंतर २०१५ पासून ते आजतागायत आमोद जम्मू-काश्मीर पोलीस दलात आहेत. आमोद २०१६ मध्ये श्रीनगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुझू झाले. त्यानंतर २०१७ मध्ये बढती मिळून बडगाम जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर आले, त्यानंतर ते हजरतबल येथे पोलीस अधिक्षक आणि सध्या बडगाम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -