घरदेश-विदेशश्रीनगरमध्ये मोठी दुर्घटना टळली; सुरक्षा दलासोबत घातपात करण्यासाठी ठेवलेले ५ किलो IED...

श्रीनगरमध्ये मोठी दुर्घटना टळली; सुरक्षा दलासोबत घातपात करण्यासाठी ठेवलेले ५ किलो IED जप्त

Subscribe

सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा मोठी दुर्घटना टळली आहे. सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी श्रीनगर महामार्गावर वानपोर भागातील रस्त्यावर आयईडी पेरली होते. मात्र दहशतवाद्यांना कटात यश येण्यापूर्वी सुरक्षा दलाच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या कटाची माहिती दिली.  यावेळी शोध मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला लावलेला ५ किलोचा आयईडी साठा जप्त केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, काही दहशतवादी आयईडी स्फोट घडवून सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष करण्याच्या तयारीत होते. अशी माहिती पुलवामा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुलवामा पोलिसांच्या ५० आरआर आणि बीएसएफचे १८३ बटालियनचे जवान श्रीनगर वानपोरा परिसरात पोहचले. यावेळी रस्त्याच्या खाली लपवलेल्या आयईडी स्फोटकांची तपासणी करण्यात आली. सुरक्षा दलांना रस्त्याच्या एकदम कडेला असलेल्या मातीत आयईडी स्फोटक पदार्थ लपवून ठेवले होते. यावेळी उपकरणांच्या माध्यमातून शोधले असता ते आयईडी असल्याचेच आढळून आले.

- Advertisement -

सुरक्षा दलांनी तात्काळ कारवाई करत श्रीनगर वानपोरा रस्त्यावरील वाहनांची वाहतूक थांबवली आणि बॉम्ब शोधक पथकाला माहिती दिली. काही वेळातच बॉम्बशोधक पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी माती खोदून आयईडी स्फोटक बाहेर काढले. आयईडीचे वजन सुमारे पाच किलो असून ते एका कंटेनरमध्ये ठेवण्यात आले होते. सुरक्षा दलांनी सांगितले की, जर दहशतवाद्यांचा कट यशस्वी झाला असता तर त्या मार्गावरून जाणारे सुरक्षा दल त्यांच्या स्फोटात गंभीररित्या जखमी झाले असते. याशिवाय मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती.

आयईडी काढता आला नाही, त्यामुळे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सुरक्षित केला आणि ते आयईडी निष्क्रिय केला. त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आजूबाजूच्या काही भागांना चौकशीसाठी घेरले आहे. वेळीच कारवाई केल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिसांनी सांगितले.


Maharashtra Assembly Winter Session 2021: वीज कनेक्शन नसताना शेतकऱ्याला ७० हजाराचे बिल, प्रवीण दरेकरांची टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -