घरदेश-विदेशमहिलांच्या प्रश्नांवर जय बच्चन आक्रमक

महिलांच्या प्रश्नांवर जय बच्चन आक्रमक

Subscribe

राज्यसभेमध्ये महिलांच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत जया बच्चन यांनी महिलांच्या सुरक्षेवर बोलताना सरकारला चांगलेच धारेवर धरले.

महिलांच्या विरोधात वाढत जाणाऱ्या अपराधांवर बुधवारी राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन चांगल्याच भडकल्या. राज्यसभेमध्ये देशातील महिलांवर वाढत जाणाऱ्या अत्याचारांवर चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान, केंद्रीय महिला आणि बालविकास राज्य मंत्री वीरेंद्र कुमार यांनी देशात महिलांवर आत्याचार घडलेल्या घटनांचे काही आकडे समोर ठेवले. या आकड्यांवर जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली. जया यांनी थॉमसन रॉयटर्सच्या अहवालाचा संदर्भ देत महिलांच्या बाबतीत भारत हा सर्वात असुरक्षित असल्याचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जया म्हणाल्या की, ‘ही एक लाजिरवाणी बाब आहे की, याअगोदर भारत सातव्या क्रमांकावर होता आणि आता तो पहिल्या क्रमांकावर आला आहे’.

जया बच्चन यांचा सवाल

वीरेंद्र कुमार यांनी यावेळी २०१५ पर्यंत घडलेल्या घटनांचे आकडे सांगितले. जया यांनी ‘२०१६, २०१७, २०१८ या वर्षांमध्ये जे काही झाले, ते तुम्ही विसरला आहात का?’ असा सवाल केला. यावर कुमार यांनी अजून या वर्षांचे आकडे आले नसल्याचे सांगितले. मुलींवर आत्याचार होणाऱ्या घटना दिवसेंदिवस मोठ्या वेगाने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. जया यांनी कठुआ प्रकरणावर बोलताना सरकारला खडेबोल सुनावले.

- Advertisement -

वीरेंद्र कुमार यांचे उत्तर

जया यांच्या थॉमसन रॉयटर्सच्या अहवालाच्या मुद्यावर बोलताना वीरेंद्र कुमार म्हणाले की, ‘ज्या अहवालाविषयी बोलले जात आहे, त्या अहवालाचा भारत सरकारशी काहीही संबंध नाही. या अहवालाच्या सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने भारत सरकारशी कुठल्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही. त्यामुळे कुठल्या आधारावर हे सर्वेक्षण केले गेले आहे, ते अस्पष्ट आहे’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -