घरदेश-विदेशJharkhand Naxalite : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा कट फसला: 15 IED कुकर बॉम्ब...

Jharkhand Naxalite : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा कट फसला: 15 IED कुकर बॉम्ब जप्त

Subscribe

सुरक्षा दलांच्या वाढत्या कारवायांना घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी स्वत:च्या बचावासाठी ही स्फोटके पेरण्यात आल्याचे सांगण्यात येतेय.

झारखंड पोलिसांनी नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. सरायकेला पोलिसांनी मोठ्याप्रमाणात आयईडी बॉम्ब जप्त केले आहेत. कुचई पोलिस स्टेशन परिसरात पोलीस पथकाची नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरु होती. याचदरम्यान, कडे रांगो टेकडीच्या पश्चिमेला दीड किलोमीटरच्या दिशेने जंगलाच्या रस्त्यावर 15 आयडी बॉम्ब पेरण्यात आले होते. नक्षलवाद्यांनी हे बॉम्ब जमिनीत लपवून ठेवले होते. यातून मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत ते होते. मात्र सेराकेलामध्ये नक्षलवाद्यांचा हा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. दरम्यान BDDS टीमच्या मदतीने हे 15 आयडी कुकर बॉम्ब जप्त करून नष्ट करण्यात आलेत. अशातच आज ( NIA नक्षलवादी ) एनआयएने कोलकाता येथून नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या एका व्यावसायिकाला बेड्या ठोकल्या आहेत.

सरायकेलामध्ये 15 आयडी कुकर बॉम्ब सापडल्यानंतर नक्षलवाद्यांविरोधात आता जोरदार शोध मोहीम सुरू आहे. मात्र या घटनेमुळे आता परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी तपास सुरू झाला असून सुरक्षा दलांनी जमिनीत लपवून ठेवलेले 15 बॉम्ब जप्त केले आहेत. हे सर्व बॉम्ब प्रेशर कुकरमध्ये ठेवण्यात आले होते.

- Advertisement -

शोध मोहिमेदरम्यान स्फोटके जप्त

शोध मोहिमेदरम्यान सर्व स्फोटके नष्ट करण्यात आली आहेत. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, सुरक्षा दलांना इजा करण्याच्या उद्देशाने हे बॉम्ब पेरण्यात आल्याचा दावा केला जात आहे. कुचई पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांच्या विरोधात पोलिसांकडून शोध मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, कडे रांगो टेकडीच्या पश्चिमेला दीड किलोमीटरच्या दिशेने जंगलाच्या वाटेवरील जमिनीतून हे बॉम्ब सापडले आगे. तपासादरम्यान सुरक्षा दलांना याची माहिती मिळाली. यानंतर जमिनीत खड्डा खणून सर्व बॉम्ब काढण्यात आलेत.

नक्षलवाद्यांनी बचावासाठी पेरली स्फोटके

सुरक्षा दलांच्या वाढत्या कारवायांना घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी स्वत:च्या बचावासाठी ही स्फोटके पेरल्याचे सांगण्यात येतेय. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना वेळीच याची माहिती मिळाली नसती तर मोठी हानी होण्याची शक्यता होती.


कोरोनामुळे शाहीर शेखच्या वडिलांची प्रकृती गंभीर; चाहत्यांना केले प्रार्थनेचे आवाहन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -