घरदेश-विदेशसुप्रीम कोर्टाचे बंडखोर न्यायाधीश जे. चेलमेश्वर निवृत्त

सुप्रीम कोर्टाचे बंडखोर न्यायाधीश जे. चेलमेश्वर निवृत्त

Subscribe

सुप्रीम कोर्टाचे बंडखोर न्यायाधीश जस्टी चेलमेश्वर आज निवृत्त झाले आहेत. १८ मे २०१८ रोजी त्यांचा सुप्रीम कोर्टातील कामकाजाचा शेवटचा दिवस होता. मुख्य सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात त्यांनी बंडखोरी केली होती.

सुप्रीम कोर्टातील बंडखोर न्यायाधीशांपैकी एक असलेले न्या. जस्टी चेलमेश्वर आज निवृत्त झाले आहेत. दरम्यान, कोर्टाला एक महिना उन्हाळ्याची सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या महिन्यातील १८ तारखेलाच न्या. चेलमेश्वर यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस मानण्यात आला. सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात चार न्यायाधीशांनी बंड पुकारले होते. या प्रकरणामुळे न्या. चेलमेश्वर चर्चेत होते. जानेवारी २०१८ ला दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सुप्रीम कोर्ट व्यवस्थित कामकाज करत नसल्याचा आरोप या चार न्यायाधीशांनी मुख्य सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर केला होता. यावेळी न्या. जे. चेलमेश्वर यांच्यासह न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकुर आणि न्या. कुरियन जोसफ उपस्थित होते. या प्रकारामुळे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये खळबळ माजली होती. यानंतरही सुप्रीम कोर्टाच्या ढिसाळ कारभाराचे दाखले न्या. चेलमेश्वर वारंवार देत होते.

Justice Jasti Chelameswar,Justices Ranjan Gogoi, M.B. Lokur and Kurian Joseph
न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकुर आणि न्या. कुरियन जोसफ

नागरिकांच्या गोपनीयतेवर महत्त्वाचा निर्णय 

न्या. चेलमेश्वर यांची १० ऑक्टोबर २०११ साली सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. गोपनीयता हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. हा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. हा निर्णय देणाऱ्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये न्या. चेलमेश्वर यांचा समावेश होता. न्या. चेलमेश्वर सहा वर्ष आठ महिने आणि १२ दिवस सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

- Advertisement -

जवळून पाहिले कामकाज

“न्या. चेलमेश्वर हे एक महान न्यायाधीश आहेत. चांगला माणूस म्हणूनही ते माझ्या स्मरणात राहतील. त्यांनी न्यायव्यवस्थेला व्यवस्थेचा सन्मान दिला आहे. न्यायमूर्ती चेलमेश्वर हे खरे व्यक्ती आहेत,” अशी प्रतिक्रीया २०११ पासून सुप्रीम कोर्टात त्यांच्यासोबत असणारे खासगी सचिव यांनी न्या. चेलमेश्वर यांच्या निवृत्ती दिवशी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -