घरदेश-विदेशरेल्वेकडून मिळणार लवकरच 'ही' सुविधा

रेल्वेकडून मिळणार लवकरच ‘ही’ सुविधा

Subscribe

रेल्वेकडून आजपर्यंत नेहमीच नव्या सुविधा देण्यात येत असून आयआरसीटीसी यासाठी स्वतःचं पेमेंट अॅग्रीगेटर आणण्याची तयारी करत आहेत. यानंतर तिकीट बुक करण्यासाठी बँक वॉलेट अथवा कोणत्याही बँकेच्या कार्डाची गरज भासणार नाही.

तुम्ही जर बाहेरगावी जाण्यासाठी नियमित रेल्वेनं प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. रेल्वे प्रशासनानं IRCTC-ipay ने प्रवास करणाऱ्यांसाठी ही भेट दिली आहे. आयआरसीटीसीकडून देण्यात येणाऱ्या येणाऱ्या नव्या सुविधांमध्ये आता रेल कनेक्ट अॅप अथवा वेबवरून तिकीट नोंदणी करण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षाची (थर्ड वेंडर) अथवा डिजीटल वॉलेटची गरज भासणार नाही. रेल्वेकडून आजपर्यंत नेहमीच नव्या सुविधा देण्यात येत असून काही दिवसांपूर्वीच ‘रेल्वे मदत’ आणि ‘मेन्यू ऑन रेल’ या अॅपच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

पेमेंट अॅग्रीगेटर आणणार

आयआरसीटीसी यासाठी स्वतःचं पेमेंट अॅग्रीगेटर आणण्याची तयारी करत आहेत. यानंतर तिकीट बुक करण्यासाठी बँक वॉलेट अथवा कोणत्याही बँकेच्या कार्डाची गरज भासणार नाही. या पेमेंट अॅग्रीगेटरचं नाव IRCTC-ipay असं असून यासंदर्भात ट्विट करून आयआरसीटीसीनं माहिती दिली. हे अॅप सुरु झाल्यानंतर ऑनलाईन फ्रॉडला आळा बसेल असं म्हटलं जात आहे. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर IRCTC-ipay चं पेमेंट अॅग्रीगेटर उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबतचे अधिक तपशील अजूनपर्यंत सांगण्यात आले नसले तरीही यासंदर्भातील पीसीआय – डीएसएस (पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्युरीटी स्टँडर्ड) सिक्युरीटी सर्टिफिकिट आयआरसीटीद्वारे संमत करण्यात आलं असल्याचंदेखील ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

याव्यतिरिक्त पुरवणार या सेवा

याव्यतिरिक्त आयआरसीटीसीकडून आयआरसीटीसी एसबीआय कार्डदेखील पुरवण्यात येणार आहे. ज्याद्वारे एसी १, एसी ११ अथवा चेअर कारची तिकीट नोंदणी केल्यास, १० टक्के कॅशबॅक मिळेल. तसचं या कार्डाद्वारे तिकीट नोंदणी केल्यास, ट्रान्झॅक्शनवर लागणारा १.८ टक्के आयकरदेखील वाचू शकतो. तर कार्ड मिळाल्यापासून ३० दिवसात पैसे काढल्यास, १०० रुपये कॅशबॅक मिळू शकेल. यातून रिवॉर्ड पॉईंट्सदेखील मिळतील. ज्याचा नंतर तिकीट नोंदणीसाठी उपयोग करता येऊ शकतो.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -