घरदेश-विदेशJustin Trudeau : कॅनडाच्या पंतप्रधानांचा हरदीपसिंग निज्जर हत्येवरून पुन्हा भारतावर हल्लाबोल; म्हणाले...

Justin Trudeau : कॅनडाच्या पंतप्रधानांचा हरदीपसिंग निज्जर हत्येवरून पुन्हा भारतावर हल्लाबोल; म्हणाले…

Subscribe

गेल्या जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॅनडाच्या सरकारने हरदीपसिंगच्या हत्येचा आरोप भारतावर लावला होता. पण भारत सरकारने कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले.

टोरंटो : नुकतेच खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॅनडाच्या सरकारने हरदीपसिंगच्या हत्येचा आरोप भारतावर लावला होता. यानंतर भारत आणि कॅनडामधील मैत्रीपूर्ण संबंधात मीठाचा खडा पडला आहेत. हरदीपसिंग निज्जर हत्येमागे भारत सरकारचा हात आहे, असे म्हणण्याचे आमची काही कारणे आहे, असे विधान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी माध्यमांशी बोलातना केले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले, “कॅनडातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या सुरक्षा सेवांचा विस्तार करणे आवश्यक आहे. म्हणून त्या दिवशी आम्ही हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कॅनेडियन लोकांना संदेश दिला होता.” जस्टिन ट्रूडो म्हणाले, “निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारचा हात आहे, असे मानण्याची आमच्याकडे कारणे आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा – वाद सुरूच : भारतात आलेल्या कॅनडाच्या नागरिकांसाठी नवी Advisory; घातली ‘ही’ बंधने

कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, ‘हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येचा दोन्ही देशांमधील संबंधांवर कोणताही परिणाम झाला नसेल तर ते हास्यास्पद आहे,’ असे ते म्हणाले. “18 सप्टेंबर रोजी केलेल्या घोषणेनंतर केवळ भारताकडूनच नव्हे तर कंझर्व्हेटिव्ह नेते पियरे पॉइलीव्हरे यांच्याकडूनही पुरावे मागवण्यात आले होते”, असे जस्टिन ट्रूडो म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – 50 गोळ्या झाडून हरदिपसिंग निज्जरची हत्या; व्हिडीओचा हवाला देत अमेरिकन वृत्तपत्राचे धक्कादायक दावे

खलिस्तानी दहशतवाद्याची कॅनेडामध्ये हत्या

गेल्या जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॅनडाच्या सरकारने हरदीपसिंगच्या हत्येचा आरोप भारतावर लावला होता. पण भारत सरकारने कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलीन जोली म्हणाल्या की, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारत सरकारवर आरोप करण्यापूर्वी आमच्या सरकारने अनेक वेळा भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या संवादांमध्ये हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येसंदर्भातील माहिती आणि आरोपांवरही चर्चा झाली. कॅनडाच्या 41 दूतावासातील अधिकाऱ्यांची ताकत काढून टाकण्याचा निर्णयही जॉली यांनी अभूतपूर्व असल्याचे म्हटले. निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंधमध्ये तणाव निर्माण असून भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित दिली होती. त्यावेळी कॅनडाने आपल्या नागरिकांना भारतात प्रवास टाळण्याचा देखील सल्ला दिला होता. नवी दिल्लीच्या अल्टिमेटमनंतर कॅनडाच्या दूतावासातील अधिकारी मायदेशी परतत असल्याची घोषणा कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी केली. कॅनडाला भारताने त्यांच्या दूतावासातील अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्याचा अल्टिमेटम दिला होता

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -