घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्याकडून...; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर विरोधक आक्रमक

Winter Session : नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्याकडून…; अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विरोधक आक्रमक

Subscribe

नागपूर : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे. दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून सारथी व महाड्योती प्रकल्पांतर्गत पीएच. डी. चा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विरोधक म्हणाले की, वरिष्ठ अभ्यासक्रमात संशोधनाचा विषय म्हणून सारथी व महाज्योती प्रकल्पांतर्गत विद्यार्थी पीएच. डी. साठी अर्ज करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढविण्यात यावी. या प्रश्नाला उत्तर देताना चर्चेत सहभागी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, पीएच. डी. करून काय दिवे लावणार? अजित पवारांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षातील नेत्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. (Winter Session From Non Graduate Deputy Chief Minister Opposition aggressive on Ajit Pawar PhD statement)

हेही वाचा – Winter Session : BMC वरील प्रशासक बेलगाम; ‘त्या’ जाहिरातीचा मुद्दा उपस्थित करत अनिल परबांचे आरोप

- Advertisement -

अजित पवारांच्या पीएच. डी. संदर्भातील वक्तव्याचा निषेध करताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले की, हे असंवेदनशील सरकार आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यातून शिक्षणाबद्दल अनास्था दिसून येत आहे. पीएचडी करून केवळ नोकरी मिळत नसते तर संशोधन देखील करण्यात येतात. आपल्या देशात केवळ 0.5 टक्के विद्यार्थी पीएच. डी. होतात. सारथीसाठी दिलेल्या जाहिरातीत पात्र विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येईल, असा कुठेही उल्लेख नव्हता. त्याविरोधात 45 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. 1329 विद्यार्थी पात्र झाले असून त्यांना जाहिरातीनुसार फेलोशिप प्रदान करावी, अशी मागणी मनोज आखरे यांनी केली.

अजित पवारांच्या वक्तव्याचा विरोधकांकडून खरपूस समाचार

पीएचडी करून काय दिवे लावतील, अशी टीप्पणी अजित पवारांनी विधानपरिषदेत केले, यावर संजय राऊत यांनी पलवाट करत म्हटले की, “मोदींनी सांगितले आहे पकोडे तळा.” तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अजित पवारांच्या वक्तव्यावरून या सरकारचा जो माज आहे तो सप्ष्ट होत आहे. आमच्या आदर्शाने शिक्षणाचा पाया रोवला गेले, परंतु ज्या पद्धतीने अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. त्यावरून हे सरकार शिक्षणाविरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, अजित पवार यांनी पीएचडी धारक विद्यार्थ्यांची थट्टा करू नये, काल सभागृहात थट्टा झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : लोकसभेतील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही; विरोधकांकडून राजकारण तर, सरकार म्हणते…

अजित पवार काय म्हणाले?

काँग्रेस आमदार सतेज पाटील म्हणाले की, शासनाने सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी समितीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 1319 विद्यार्थ्यांनी पीएच. डी. साठी अर्ज केले होते. त्यामुळे पुढील ही संख्या वाढविण्यात यावी. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, राज्यात होत असलेल्या पीएचडींपैकी खरंच किती पीएचडींची आपल्याला गरज आहे? संख्या वाढवून काय करणार? पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? त्यावर सतेज पाटील म्हणाले की, असे कसे म्हणता. या योजनेमुळे पीएच. डी. धारकांची संख्या वाढणार आहे. त्याचा फायदाच होणार आहे, असे सांगत अजित पवार यांच्याकडून पुढील उत्तराची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर विविध सदस्यांनी याबाबतच्या अडचणी मांडल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -