Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश JDS च्या देवगौडांच्या हाती आता 'कमळ'; आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय

JDS च्या देवगौडांच्या हाती आता ‘कमळ’; आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दारून पराभव झालेल्या भाजपने आता आगामी लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

बंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आता आपली ताकद दाखवण्यास सुरूवात केली आहे. तर मोदींना रोखण्यासाठी आणि पुढील निवडणुकांमध्ये भाजपचा परावभ करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी उघडली असून, यामध्ये आतापर्यंत 28 पक्ष सहभागी झाले आहे. तर अद्यापही अनेक पक्षांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. यादरम्यान कर्नाटकातील जेडीएस पक्षाने अखेर आपला निर्णय जाहीर केला असून, ते इंडिया आघाडीएवजी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.(Kamal now in the hands of Dev Gowda of JDS A decision to fight the upcoming elections together)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दारून पराभव झालेल्या भाजपने आता आगामी लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. तर आपली एनडीए आणखी भक्कम करण्यासाठी उरलेल्या पक्षांना एनडीएमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान आता कर्नाटकातीलच जनता दल (सेक्युलर) म्हणजेच जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एनडीएमध्ये आणखी एक पक्ष सहभागी झाल्याने एनडीएची ताकद वाढली असून, इंडिया आघाडीसाठी हा खूप मोठा धक्का मानल्या जातोय.

- Advertisement -

हेही वाचा : जंत्र-तंत्र-मंत्र जादूटोणा यातच अडकलेत…; भीमाशंकर यात्रेवरून राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

जागा वाटपाचा प्रश्न चर्चेतून सुटणार

भाजपला साथ देण्याचे ठरल्यानंतर जेडीएसच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना एचडी देवेगौडा म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. तर पुढील काळात एचडी कुमारस्वामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपापसांत चर्चा करुन जागा वाटपाचा फार्मुला ठरवणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

इंडिया आघाडीतील नेत्यांनी संपर्क न केल्याचा केला आरोप

- Advertisement -

जेडीएसच्या एका कार्यक्रमात बोलताना देवेगौडा म्हणाले की, आपला पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष असूनही आपल्याला इंडिया आघाडीतील कुठल्याही नेत्यांनी इंडिया आघाडी येण्याचे निमंत्रण दिले नाही. त्यामुळे आपल्या पक्षाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : ढोंगीपणाचीही सीमा असते… ‘भारत’ नावावरून संजय राऊत यांचा भाजपावर निशाणा

2019 च्या निवडणुकीत भाजपच होता एकनंबरचा पक्ष

2019 मध्ये कर्नाटकमधील 28 पैकी 25 जागांवर भाजपला विजय मिळाला होता. तर, एका जागेवर भाजपने पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी झाला होता. काँग्रेस-जेडीएसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. कर्नाटक विधासभेत पराभव झाल्याने आता भाजपला ही कामगिरी पुन्हा करणे कितपत शक्य आहे, यावर प्रश्न निर्माण झाले आहेत.

- Advertisment -