घरदेश-विदेशKangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा लढवणार! वडिलांनीच दिला दुजोरा

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा लढवणार! वडिलांनीच दिला दुजोरा

Subscribe

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणारी कंगना रणौत ही तिच्या अभिनयाबरोबरच वादग्रस्त वक्तव्यानेही चर्चेत असते. अशातच कंगना ही भाजप समर्थक असल्याचेही तिने अनेकदा तिच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रणौत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची अधिकृत माहिती कंगनाच्या वडिलानीच दिली असून, कंगनाला जर भाजपने तिकिट दिले तर ती हिमाचल प्रदेश, किंवा महाराष्ट्रातून निवडणूक लढवू शकते असेही तिच्या वडिलांनी सांगितले आहे. (Kangana Ranaut Actress Kangana Ranaut will contest the Lok Sabha! Father himself confirmed it)

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणारी कंगना रणौत ही तिच्या अभिनयाबरोबरच वादग्रस्त वक्तव्यानेही चर्चेत असते. अशातच कंगना ही भाजप समर्थक असल्याचेही तिने अनेकदा तिच्या कृतीतून दाखवून दिले आहे. अशातच ती आता अभिनयाबरोबरच राजकीय आखाड्यातसुद्धा नशीब आजमावणार असल्याची बोलले जात असतानच तिच्या वडिलांकडूनच आता याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आला असून, तिला तिकिट दिल्यानंतर नक्कीच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या वडिलांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, कंगनाने निवडणूक लढवायची हे भाजपला ठरवायचे आहे. कंगना राणौतच्या वडिलांचे नाव अमरदीप राणौत आहे. कंगना भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले. त्या कोणत्या जागेवरून उभ्या राहतील असे विचारले असता, ते म्हणाले की, हा निर्णय पक्ष घेईल असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : INDIA Meeting : दिल्लीत ‘इंडिया’ची बैठक, उद्धव ठाकरे, शरद पवार होणार सहभागी

- Advertisement -

कंगनाकडून RSS चे कौतुक

कंगना रणौतने नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कौतुक केले होते. आरएसएसने देशासाठी खूप काही केले आहे आणि आजही राष्ट्राला जोडण्याचे काम करत असल्याचे ती म्हणाली होती. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, माझी क्रांतिकारी विचारधारा आरएसएसशी जुळते. म्हणूनच या देशभक्त संस्थेच्या कार्यपद्धतीने मी प्रभावित झाली आहे असेही कंगना म्हणाली होती. एवढेच नव्हे तर आरएसएसने देशाला जोडण्याचे काम केले आहे. त्यांनी प्रशिक्षित केलेले लोक सत्तेवर आल्यावर जे काम 70 वर्षात होऊ शकले नाही ते केवळ 8 ते 10 वर्षात झाले. अशा शब्दांत कंगना रणौत हिने संघाचे कौतुक केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -