घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘अंबड’चे प्रमोद वाघ यांची तडकाफडकी बदली

‘अंबड’चे प्रमोद वाघ यांची तडकाफडकी बदली

Subscribe

अंबड पोलीस ठाण्याची धुरा सांभाळणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची सोमवारी (दि.१८) पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. वाघ यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. वाघ यांची बदली गोळीबारप्रकरणामुळे झाली असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.. विशेष म्हणजे, अंबड पोलीस ठाण्याला वर्षभरात पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेमणुका करण्यात आल्या आहेत.
कुमार चौधरी यांची बदली झाल्यानंतर आलेल्या भगीरथ देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांना नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले. यावेळी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांनी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. परंतु, काही दिवसातच पुन्हा त्यांच्या ऐवजी पंचवटी पोलीस ठाण्यात असणारे युवराज पत्की हे प्रभारी म्हणून बगाडे यांच्या जागी नियुक्त करण्यात आले. संपूर्ण नाशिक शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. युवराज पत्की यांना मुंबई नाका येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करत अंबड पोलीस ठाण्यास नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सूज बिजली यांची नियुक्ती करण्याततााली. तर तीन महिन्यातच बिजली यांना सांगली येथे बदली करण्यात आली.

सद्यस्थितीत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोद वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. पाच महिन्यात पुन्हा एकदा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहे.येत्या काही दिवसात पुन्हा अंबड पोलीस ठाण्यास नव्याने पोलीस निरीक्षक मिळणार आहे. आता तरी अंबड पोलीस ठाण्यात नेमण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पूर्ण कालावधीपर्यंत राहवू द्या, नाहीतर पुन्हा चार महिन्यात नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकास बघावे लागेल अश प्रतिक्रिया सिडकोवासियांमधून उपस्थित केल्या जात आहेत.

- Advertisement -

राजकीय वजन वापरून बदली 

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पवन नगर परिसरात झालेल्या गोळीबारतील संशयितावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वजन वापरून वाघ यांची बदली करण्यात आली आहे, अशी चर्चा सिडकोवासियांमध्ये सुरु आहे. दोन राजकीय नेत्यांच्या अंतर्गत वादातून ही बदली झाली असल्याची शक्यता नाकरता येत नाही.याबाबतही सिडकोवासियांमधून तर्क वितर्क लावले जात आहेत. तर राजकीय नेत्यांच्या अंतर्गत वादाचा बळी शासकीय अधिकारी वा कर्मचारी का ठरावे म्हणून सिडको वासियांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे.सकल मराठा समाज आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल न केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची बदली करण्यात आली होती. मात्र, सिडकोमध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृतवाने सर्वसामान्य सिडकोवासियांची जिंकलेली मने लक्षात घेत कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवल्याने त्यांना पुन्हा अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली. काही महिने उलटत नाही तो पर्यंत पुन्हा त्यांना बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.

असा आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा कार्यकाळ

  • भगीरथ देशमुख २६ नोव्हेंबर २०२१ ते १८ जानेवारी २०२३
  • नंदन बगाडे १८ जानेवारी २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२३
  • युवराज पत्की ७ फेब्रुवारी २३ ते २७ मार्च २०२३
  • सूरज बिजली २७ मार्च २०२३ ते २६ जून २०२३
  • प्रमोद वाघ १ जुलै २०२३ ते १८ डिसेंबर २०२३
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -