घरदेश-विदेशकेरळमध्ये पावसाचा हाहाकार; ३ लोकांचा मृत्यू

केरळमध्ये पावसाचा हाहाकार; ३ लोकांचा मृत्यू

Subscribe

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोझिकोड आणि कुन्नूरमध्ये गेल्या २४ तासापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका ९ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर १० जण बेपत्ता झाल्याचे समोर आलं आहे. कोझिकोडच्या कट्टीपार येथे भूस्खलनामध्ये ८ जण ठिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कर्नाकच्या बेळगावमध्ये नदीला आलेल्या पूरामध्ये पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे.

मुसळधार पावसामुळे भूस्खलन

केरळच्या कोझिकोड येथे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्याचे समोर आलं आहे. कोझिकोड येथे भूस्खलनामुळे ८ जण ठिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली आहे. तर काही ठिकाणी रस्त्यांचे मोठं नुकसान झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पूरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी घटनास्थळावर एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.

- Advertisement -

पूरामध्ये पुल वाहून गेला

कोट्टयम आलप्पुषा, वायनाड और कोझिकोडेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी शाळेला सुट्टी दिल्याचे घोषित केलं. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत. बुधवारी पठानमट्टियामध्ये दोन व्यक्ती पूरामध्ये वाहून गेले. तर मुसळधार पावसामुळे २७२ घरांचे मोठं नुकसान झालं आहे. कोझिकोडे येथे केरळ आणि कर्नाटकाला जोडणारा पुल पूरामध्ये वाहून गेला आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी १०० पेक्षा अधिक झाडे जमीनदोस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisement -

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

केरळच्या इडुक्की, वेनाद, कोझिकोड जिल्ह्यामध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तर कन्नूर, कोझिकोडे, कोट्टायम आणि आलप्पुषा जिल्ह्यामध्ये पूरामध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ४७४ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. गेल्या चार दिवापासून पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून होत आहे. पूरामध्ये हजारो हेक्टर शेताचे मोठं नुकसाना झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -