घरमहाराष्ट्रभय्यू महाराजांच्या आत्महत्येमागे पत्नी आणि मुलीतील वाद?

भय्यू महाराजांच्या आत्महत्येमागे पत्नी आणि मुलीतील वाद?

Subscribe

भय्यू महाराजांची मालमत्ता सेवकाच्या नावावर !

भय्यू महाराज यांची पॉकेट डायरी सापडली असून त्यात त्यांनी आपला सेवक विनायक याला सर्व आर्थिक अधिकार देत असल्याचे लिहिले आहे. भय्यू महाराज यांच्या मृत्यूला त्यांची द्वितीय पत्नी आणि पहिल्या पत्नीची मुलगी यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.भय्यू महाराज यांचे पार्थिव सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सजवलेल्या रथातून भय्यू महाराजांची अत्यंयत्रा सूर्योदय आश्रमातून मुक्तीधाम स्मशानभूमीच्या दिशेने निघाली. पण त्यांच्या आत्महत्येमागे आता पत्नी आणि मुलीतला वाद असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

कन्या ‘कुहू’ने दिला पार्थिवाला मुखाग्नी

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भय्यू महाराजांची कन्या कुहू हिने महाराजांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला.

- Advertisement -

ती महिला कोण?

आत्महत्येच्या एक दिवस आधी इंदूर येथील रेस्टॉरण्टमध्ये भय्यूजींना एक महिला भेटली होती. ही महिला कोण, याचा शोधही पोलीस घेत आहेत. तसेच पोलिसांनी महाराजांचा मोबाइल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सुरू केला आहे.आश्रम परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते.

सेवकाच्या नावावर मालमत्ता

भय्यू महाराज यांची एक पॉकेट डायरी सापडली आहे. त्यात त्यांनी आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे अधिकार सेवक विनायककडे सोपविले असल्याचे लिहिले आहे. इंदूर पोलिसांनीच भय्यू महाराजांच्या या पॉकेट डायरीचा खुलासा केला आहे. भय्यू महाराज यांच्या सापडलेल्या डायरीतील नोंदीतून त्यांनी आपल्या मागे सर्व आर्थिक अधिकार विनायक नावाच्या त्यांच्या सेवकाकडे सोपवावेत, असे नमूद केले आहे.

- Advertisement -

विनायक त्यांचा अत्यंत विश्वासू सेवक आहे. तो नेहमी भय्यू महाराजांच्या सोबत असायचा. तसेच भय्यू महाराजांच्या महाराष्ट्रातील जनहिताच्या प्रकल्पांची जबाबदारी विनायक याच्याकडेच होती. भय्यू महाराजांनी आत्महत्या केली तेव्हा विनायक पुण्याला भय्यू महाराजांच्या मुलीला आणायला गेला होता.

पत्नी, मुलीतील वाद

द्वितीय पत्नी डॉ. आयुषी आणि पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी कुहू यांच्यातील वादाला कंटाळून भय्यू महाराजांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जाते. भय्यू महाराजांच्या कुटुंबातील सदस्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर महाराजांनी डॉ. आयुषी शर्मा हिच्याशी दुसरा विवाह केला. परंतु, कुहूचे तिच्या सावत्र आईशी कधीच पटत नव्हते. या दोघींमध्ये सतत भांडणे होत असत. त्यामुळे भय्यू महाराज काळजीत असायचे. मंगळवारी कुहू पुण्याहून इंदूरला येणार होती. तिच्या खोलीतील सामान इतस्तत: पसरले होते. भय्यू महाराजांनी नोकराला खोलीतील वस्तू नीट करायला सांगितल्या. यावेळी त्यांची पत्नी घरी नव्हती. काही वेळाने महाराजांनी आपल्या मुलीच्या खोलीतच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

सावत्र आईवर मुलीचा आरोप

भय्यूजींची मुलगी कुहू घरी आल्यावर तिने वडिलांचा मृतदेह पाहिला. आपल्या सावत्र आईमुळेच भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचा आरोप तिने केला. डॉ. आयुषीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे तिला अटक करण्यात यावी, अशी विनंतीही कुहूने पोलिसांना केली आहे. संतप्त झालेल्या कुहूने तिच्या खोलीतील सगळ्या फोटो फ्रेम तोडून टाकल्या असे कळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -