घरदेश-विदेशकुलगाम चकमकीत ३ जणांचा खात्मा; डीएसपी शहीद

कुलगाम चकमकीत ३ जणांचा खात्मा; डीएसपी शहीद

Subscribe

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात तारिगाम येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले असून डीएसपी अमन ठाकूर या चकमकीत शहीद झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागामध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात तारिगाम येथे आज (रविवारी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तर डीएसपी अमन ठाकूर या चकमकीत शहीद झाले आहेत.

- Advertisement -

कुलगाम जिल्ह्यात तारिगाम येथील परिसरात अतिरेकी लपल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. या दरम्यान, सुरक्षा दलाची शोधमोहिम सुरु होती. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबार होताच सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला सुरक्षा दलाला यश आले असून या चकमकीत डीएसपी अमन ठाकूर शहीद झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -