घरदेश-विदेशसर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महिलेने केली आत्महत्या

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महिलेने केली आत्महत्या

Subscribe

विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्ण घेतला आहे. हा निर्णय ऐकताच तमिळनाडूमध्ये एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच महत्तवाचे निर्णय जाहीर केले. त्यामध्ये विवाहबाह्य हा देखील निकाल जाहीर करण्यात आला. सर्वोच्च न्यायलयाने ४९७ कलम एकमताने रद्द करण्याचा निर्णय जाहीर करत विवाहबाह्य संबंध असणे आता गुन्हा ठरणार नाही हे स्पष्ट केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने तमिळनाडू येथे एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे.

नेमके काय घडले?

तामिळनाडूमध्ये राहणारा जॉन पॉल फ्रैंकलिन याचा दोन वर्षांपूर्वी पुष्पलता या महिलेसोबत विवाह झाला होता. जॉन हा एका पार्कमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करत आहे. याच्यासोबत पुष्पलता हिने घरच्यांच्या विरोधात जाऊन जॉन फ्रैंकलिन याच्यासोबत विवाह केला. त्यानंतर पुष्पलता या टीबीच्या आजाराने ग्रासल्या होत्या. त्यामुळे तिचा नवरा तिच्याशी संबंध ठेवण्यास तयार नव्हता. तो तिच्यापासून सतत दूर राहू लागला होता. तसेच बायकोला टीबी असल्याने जॉन फ्रैंकलिने विवाहबाह्य संबंध ठेवला होता.

- Advertisement -

पुष्पलता हिला आपल्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे कळल्यानंतर तिने त्याला तिच्यापासून दूर राहण्यास सांगितले. मात्र जॉन फ्रैंकलिने विवाहबाह्य संबंध ठेवणे हा गुन्हा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच सांगितले आहे. हे ऐकताच त्या महिलेला धक्काच बसला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आपण कुठे दाद मागणार? त्याच्याविरोधात गुन्हा कुठे नोंदवणार? नवऱ्याविरोधात गुन्हा देखील नोंदवू शकत नाही असे कळल्याने आणि नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पुष्पलता या महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सुसाईड नोट सापडली

याप्रकरणी घडलेल्या घटनेची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. त्यादरम्यान या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड लिहीलेली नोट पोलिसांना सापडली. त्या सुसाईड नोटनुसार पोलीस अधिक तपास करीत असून पुष्पलता हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तर आरोपी जॉन पॉल फ्रैंकलिन याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -