घरमहाराष्ट्रराफेल प्रकरणी सरकार दोषीच; मी मोदींचे समर्थन केले नव्हते - शरद पवार

राफेल प्रकरणी सरकार दोषीच; मी मोदींचे समर्थन केले नव्हते – शरद पवार

Subscribe

राफेल घोटाळा प्रकरणी नरेंद्र मोदी यांच्या बाजूने केलेले वक्तव्य भोवल्यानंतर आता या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केले आहे. राफेल प्रकरणी सरकारचे समर्थन केले नव्हते. उलट
६५० कोटी रुपये किंमत असलेले राफेल विमान १६०० कोटी रुपयांना विकत घेतलेच कसे ? असा सवाल उपस्थित करीत राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषी आहेच, त्यामुळे त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही तर त्याची सर्वपक्षीय, संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड येथे केली. तुमचे थोडेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सत्तेची मस्ती दाखवू नका, असा इशाराही त्यांनी सरकारसह बीड जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाला दिला.

काय आहे राफेल कराराचं गौंडबंगाल ?

बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील बागलाने मैदानावर आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. बीडच्या इतिहासात प्रथमच इतकी मोठी आणि ऐतिहासिक अशी ही सभा भर उन्हात संपन्न झाली. देशाचे पंतप्रधान मन की बात सांगतात, ‘जन की बात’ मात्र सांगत नाहीत. शेतकरी, अल्पसंख्यांक, तरुणांची बात मात्र ऐकून घेत नाहीत अशा शब्दांत मोदींच्या मन की बातची त्यांनी खिल्ली उडविली. धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आरक्षणाचे काय झाले? असा प्रश्‍न विचारतानाच या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही अशा शब्दांत टोला लगावताना या सरकारला हबाडा दाखविल्याशिवाय आता गत्यंतर नसल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

मोदींच्या हेतूबाबत लोकांच्या मनात शंका नाही; पवारांचा विरोधकांना चकवा

राफेल प्रकरणी पुरावा नाही म्हणून मी कोणाचे नाव घेणार नाही, मात्र राफेलची खरी किंमत देशाला समजली पाहिजे, बोफोर्सच्या प्रकरणात आरोप झाले तेंव्हा राजीव गांधी त्याला सामोरे गेले. आजच्या सरकारला चौकशीची भिती का वाटते? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

पेट्रोल की डिझेल, कुणाची सेंच्युरी आधी होते – मुंडे

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये शतकासाठी जशी शर्यत असते तसे दराचे शतक कोणाचे आधी पूर्ण होते यावरून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शर्यत सुरु असल्याचा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने महामंडळ काढण्याची घोषणा करून फसवणूक करण्यात आली. जिल्ह्याला कर्जमाफी मिळाली नाही, बोंडअळीचे नुकसान मिळाले नाही, पिक विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाली तरी त्याचे व्याज मात्र जिल्हा बँकेचे चेअरमन खात असल्याचा घनाघात त्यांनी केला. जिल्ह्याला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, शेतकर्‍याला शेतात काही नाही, घरात काही नाही आणि सरकार फक्त घोषणा देण्याचे काम करत आहे. देशाच्या चौकीदारानेच १२५ कोटी जनतेला फसवले, आरक्षणाच्या नावावर मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला फसवले असल्याचे ते म्हणाले. आजच्या सभेने मागच्या सर्व सभांचे रेकॉर्ड ब्रेक झाले असून जिल्ह्यातील लोकसभेसह विधानसभेच्या सहाही जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

खासदार तारिक अन्वर यांचा राष्ट्रवादीला रामराम! पवारांच्या राफेल वक्तव्यावर नाराजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -