घरनवरात्रौत्सव 2022अंबाबाई मंदिरात आता तोकड्या कपड्यांवर भाविकांना प्रवेश बंदी

अंबाबाई मंदिरात आता तोकड्या कपड्यांवर भाविकांना प्रवेश बंदी

Subscribe

कोल्हापूरातील अंबाबई मंदिरात तोकड्या कपड्यावर मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने हा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता नवीन नियम लागू करण्यात आला असून या नियमानूसार भाविकांना यापुढे मंदिरात भारतीय पोषाखातच प्रवेश मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला असून तोकड्या कपड्यात भाविकांना दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना आता संपूर्ण पोषाखातच मंदिरात प्रवेश घेता येईल. विशेष म्हणजे ३ हजार मंदिरांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ड्रेसकोड केले जाहीर

आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव तसेच कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य संगीता खाडे आणि शिवाजी जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. त्यांनी पोषाखाचे प्रकारही सांगितले असून यामध्ये पुरुषांसाठी शर्ट, पँट असे पूर्ण कपडे घालून मंदिरात प्रवेश करता येईल. तर महिला तसेच तरुणींना शॉर्टस्, स्कर्ट, टॉप, थ्री- फोर्थ या पोषाखात मंदिरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे शॉर्टस्‌ घालून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार नाही, असे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

साडेतीन शक्तीपीठातील महत्त्वाचे देवस्थान

अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना भारतीय पोषाखातच प्रवेश देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सरकारी पगारी पुजारी नेमण्याचे विधेयक याच वर्षी मार्च महिन्यात मंजूर झाले होते. त्यानुसार मंदिरात राज्यस्तरीय परीक्षा घेऊन सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सुकर झाला होता. त्यात ५० टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार असून विधान परिषदेची मंजूरी आणि राज्यपालांची स्वाक्षरी या पायऱ्या पार केल्यानंतर या विधेयकाचे रूपांतर कायद्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -