घरदेश-विदेशसैनिकांच्या शौर्याचे राजकारण; माजी नौदल प्रमुखांनी व्यक्त केली नाराजी

सैनिकांच्या शौर्याचे राजकारण; माजी नौदल प्रमुखांनी व्यक्त केली नाराजी

Subscribe

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्या दहशतवादी हल्लाचे प्रत्युत्तर देत भारताच्या वायुसेनेने केलेले एअर स्ट्राइक हा आगामी निवडणुकीचा मुद्दा बनवल्यामुळे नौसेनेचे माजी प्रमुख अॅडमिरल एल रामदास यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, या सगळ्या घटनांचा आगामी निवडणुकांमध्ये मतदार खेचण्यासाठी वापर करून घेणाऱ्यांकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून केली आहे.

आयोगाला लिहिले दोन पानांचे पत्र 

नौसेनेचे माजी प्रमुख एडमिरल एल रामदास यांनी मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र लिहिले आहे. विविध राजकीय पक्षांद्वारे राजकारणाच्या फायद्यासाठी सैनिकांच्या शौर्याचा वापर करत असल्याची चिंता त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. त्यांनी असेही लिहिले आहे की, लवकरच निवडणुका येणार आहेत. या काळात सध्या चालू असलेल्या घटनांचा वापर निवडणुकांमध्ये मतदारांना आपल्याकडे आकर्षित करायला व्हायला नको, यासाठी त्यांनी आयुक्तांना दोन पानांचे पत्र लिहीले आहे.

- Advertisement -

हल्ल्याचा घटनाक्रम

पुलवामामध्ये झालेला भ्याड दहशतवादी हल्लामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्विकारली होती. या हल्ल्यानंतर जगभरातील सर्व देशांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केला.. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ला झाला आणि २६ फेब्रुवारीला भारताकडून पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धस्त करण्यात आले. त्यानंतर सतत सीमेवर चकमकी सुरूच आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचे एफ १६ विमान भारताच्या हद्दित येत असताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानचे विमान पाडले. भारतीय सैनिकांना सामान्य जनता एकाबाजुला सलाम करत असताना, दुसऱ्या बाजुला काही राजकीय पक्ष त्याचे राजकारण करताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -