घरक्राइमक्रौर्याची परिसीमा : पत्नीला 17 वेळा चाकूने भोकसले, अंगावरून गाडीही घातली; शेवटी कोर्टाने...

क्रौर्याची परिसीमा : पत्नीला 17 वेळा चाकूने भोकसले, अंगावरून गाडीही घातली; शेवटी कोर्टाने…

Subscribe

अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : पती-पत्नीचे नाते म्हणजे सर्व खास नात्यांमधील एक नातं. पती-पत्नीचं नातं हे अतिशय नाजूक असते, जे तुम्हाला पूर्ण सावधानपने आणि प्रेमाने समजून घ्यायचे असते. परंतू याच नात्यातील एखादी चूकसुद्धा दोघांचेही आयुष्य उद्धवस्त करते. अशीच एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. कारण, भारतीय वंशाच्या एका तरुणांने त्याच्या पत्नीला तब्बल 17 चाकून भोकसून तिची हत्या केली. आणि तो एवढ्यावरच न थांबता त्यांने तिच्या मृतदेहावरून गाडीही चालवत नेली. या क्रृरतेची शिक्षा त्याला सुनावण्यात आली आहे. (Limits of cruelty Wife was stabbed 17 times car was also run over her body Finally the court)

अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या क्रूरतेबद्दल फ्लोरिडाच्या एका न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी आणि त्याची पत्नी भारतातील केरळचे असल्याची माहिती समोर आली आहे. मृत महिला अमेरिकेतील रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. आरोपी पतीने आधी पत्नीवर चाकूने 17 वार केले, त्यानंतर तिच्या मृतदेहावर कार चालवली. खुनामागील कारणही समोर आले आहे.

- Advertisement -

घडलेली घटना ही 2020 मधील आहे. द सन सेंटिनेलच्या म्हणण्यानुसार, आरोपी फिलिप मॅथ्यूने त्याची पत्नी मारिन जॉय (26) हिच्यावर 17 वेळा वार केले आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी तिच्या मृतदेहावर कार चालवली. केरळमधील कोट्टायम येथील रहिवासी असलेली ही जॉय अमेरिकेतील रुग्णालयातून काम अटोपून बाहेर पडत होती तेव्हा ही घटना घडली होती. आरोपी मॅथ्यूही केरळचा रहिवासी आहे.

हेही वाचा : अमेरिकेच्या मोठ्या कंपनीकडून दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज; भारतातील व्यवसायावर होणार परिणाम?

- Advertisement -

मृत्यूपूर्वी जबाबातून घटना झाली उघड

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जॉयने मृत्यूपूर्वी हल्लेखोराची ओळख सांगितली होती. त्यानंतर पती मॅथ्यूला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर रोजी मॅथ्यूने त्याच्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध सर्व पुरावे मिळाल्यामुळे त्याची सुटका होणे शक्य नव्हते. हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा : खासदारांचे निलंबन : काँग्रेसपेक्षा भाजप काळात कारवाईचा बडगा अधिक; 2014-23 मध्ये 141 वेळा निलंबनाची…

हे आहे हत्येमागील कारण

मृत जॉय ही तिचा पती मॅथ्यूसोबतचे नाते संपवण्याचा विचार करत होती. त्यामुळे मॅथ्यू नाराज झाला होता. घटस्फोट घेण्यापूर्वी मॅथ्यूने जॉयचा खून करण्याची योजना आखली. न्यायालयाच्या निकालानंतर जॉयच्या एका नातेवाईकाने सांगितले की, तिच्या आईला हे जाणून आनंद झाला की तिच्या मुलीचा मारेकरी आपले उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -