Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Updates: आयपीएल २०२१ वेळापत्रकानुसार होणार, सौरव गांगुलींची माहीती

Live Updates: आयपीएल २०२१ वेळापत्रकानुसार होणार, सौरव गांगुलींची माहीती

Related Story

- Advertisement -

आयपीएल २०२१ चा हंगाम ठरविलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे.


राज्यात ५० हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद


- Advertisement -

मुंबईत २४ तासांत ११ हजार १६३ रुग्णांची वाढ

गेल्या २४ तासांत ११ हजार १६३ रुग्णांची वाढ झाली असून २५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५२ हजार ४४५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


- Advertisement -

राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला भाजप सहकार्य करणार – फडणवीस

विकेंडला कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी मिनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याला राज्यातील सर्व जनतेने आणि भाजप कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसानी दिले आहे. जास्तित जास्त लोकांना लसीकरण करता यावे यासाठी भाजपचे कार्यकर्ते सहकार्य करतील असा निर्णय घेतला असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.


आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळात झालेले निर्णय

संचारबंदी अत्यावश्यक सेवा
-रेस्टॉरंटमध्ये टेक अवे सुविधा
-उद्योगांच्या वेळा निश्चित होणार
-बेकरी, मेडिकल रात्री
-वर्क फ्रॉम होम (कॉल सेंटर)
– थिएटर, नाट्यगृह बंद
-धार्मिक स्थळे (संख्या निश्चित)
-गार्डन, प्ले ग्राऊंड बंद
– फिल्म शूटींग मोठ्या स्वरूपाच्या बंद

-शनिवार आणि रविवार संपूर्ण lockdown
रिक्षात दोनच प्रवासी
उद्याने आणि मैदाने बंद

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार


मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन, राज्य सरकारच्या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन


परिस्थिती गंभीर कडक निर्बंधांसाठी सहकार्य करावे, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना फोन


मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन


बॉलिवूड अभिनेता गोविंदा याला कोरोनाची लागण


VC द्वारे राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु


७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


मुंबईत अद्याप लॉकडाऊनची काहीही माहिती नाही

मुंबईत अद्याप लॉकडाऊनची काहीही माहिती आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर याबाबत चर्चा होत आहे.


लवकरच निर्बंध लावण्यात येतील 

अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहे. अजूनही लोकांबाबत गांभीर्य नाही. लोक विनाकारण गर्दी करत आहे. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. हे भाजपला कळलं पाहिजे. त्यामुळे लवकरच निर्बंध लावण्यात येतील, असे मत मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.


मोदींबरोबर आमचे व्यक्तिगत भांडण नाही- संजय राऊत

केंद्र सरकारने सर्व राज्यांना मदत करणं गरजेच आहे. विशेषत: महाराष्ट्राला. कारण महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे आपल्या विरोधी पक्ष नेत्यांना माहित असायला हवे. पंतप्रधान मोदींबरोबर आमचे व्यक्तिगत भांडण नाही किंवा केंद्र सरकारविरोधात आमचे व्यक्तिगत भांडण असण्याचा प्रश्नच नाही. पण महाराष्ट्रामध्ये भाजपाचे राज्य नाही म्हणून सत्ताधाऱ्यांची प्रत्येक बाबतीत कोंडी करायची, हे राष्ट्रीय एकात्मकतेला आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही. असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.


महाराष्ट्राने कोरोना लसीकरणात केला राष्ट्रीय विक्रम

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु असून यामध्ये ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांच्या व्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण केले जात होते. त्यानंतर आता व्याधी नसलेल्या ४५ वर्षांच्या व्यक्तींना देखील लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात सर्वात अधिक लसीकरण केले जात असून महाराष्ट्र राज्याने कोरोना लसीकरणात राष्ट्रीय विक्रम केला आहे. महत्तावाची बाब म्हणजे ३ एप्रिल रोजी राज्यात तब्बल ४ कोटी ६२ लाख लसीकरण करत महाराष्ट्र राज्याने राष्ट्रीय विक्रम केला आहे, याबाबतची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

मुंबईत आजपासून लॉकडाऊन लागण्याची शक्यता

राज्यासह मुंबईत दिवसागणित कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत आहे. मुंबईचा दररोजचा आकडा ५ हजारच्यावर असल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर विविध भाजी मंडईत जाऊन फेरीवाल्यांसह अनेक नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन करत होत्या. आता त्यांच्या पाठोपाठ मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख देखील रस्त्यावर उचलून लोकांना आवाहन करत आहे. अस्लम शेख यांनी दादर मार्केटला भेट देत फेरीवाल्यांसह विक्रेत्यांना मास्क लावत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली. विशेष म्हणजे लॉकडाऊन बाबत आजच निर्णय घेण्यात येईल’, असे देखील संकेत त्यांनी दिले आहेत.


अभिनेता अ७य कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबतच ट्विट करत त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

 


सामनाच्या रोखठोकमधून व्यक्त केली ‘लॉकडाऊन’च्या सैतानाची भीती

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव यांनी व्यक्त केली. मात्र, आता कोरोनाची नाहीतर लॉकडाऊन या सैतानाची भीती सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे. टमहाभारताचे युद्ध १८ दिवसांचे. कोरोनाचे युद्ध २१ दिवसांत जिंकू, असे वर्षभरापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. कोरोना पराभूत झाला नाही, पण ममता बॅनर्जींना हरविण्यासाठी राजकीय युद्ध सुरुच आहे’, असा टोला सामनाच्या रोखठोक मधून लगावण्यात आला आहे.

- Advertisement -