घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : कोरोनामध्ये हजारो लोकं मरत असताना, मोदी थाळ्या वाजवायला...

Lok Sabha 2024 : कोरोनामध्ये हजारो लोकं मरत असताना, मोदी थाळ्या वाजवायला सांगत होते; काँग्रेस नेते राहुल गांधींची टीका

Subscribe

Lok Sabha Election 2024 भंडाऱ्यातील साकोली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत भाष्य करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

भंडारा : कोरोना काळत गंगेत अनेक मृतदेह आढळली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला सांगत होते, थाळी वाजवा. विशेष म्हणजे मीडियाही सांगत की पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती मोठं वक्तव्य केले. एकिकडे लोकं मरतात. त्यांना श्वास घ्यायला मिळत नाही. व्हेंन्टीलेटर नाही. पण मीडिया काय सागंतो पहा पंतप्रधान नरेंद्र यांनी कमाल केली, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. (Lok Sabha Election 2024 As thousands die in Corona but Modi calls for clapping Congress leader Rahul Gandhi)

भंडाऱ्यातील साकोली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत भाष्य करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “कोरोना काळत गंगेत अनेक मृतदेह आढळली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला सांगतात, थाळी वाजवा. विशेष म्हणजे मीडियाही सांगत की पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती मोठं वक्तव्य केले. एकिकडे लोकं मरतात. त्यांना श्वास घ्यायला मिळत नाही. व्हेंन्टीलेटर नाही. पण मीडिया काय सागंतो पहा पंतप्रधान नरेंद्र यांनी कमाल केली. मरत असलेल्या भारताला खाळी वाजवण्यास सांगितले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत मोबाइलची लाइट लावा. सर्वांनी लाइट लावल्या आणि मीडियानेही दाखवलं”, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभेत देशात होणार कौटुंबिक लढती; वाचा सविस्तर

“सगळ्या गोष्टींची थट्टा मस्ती केली जात आहे. कधी एक बोलतात तर कधी दसरंच बोलतात. पण लक्ष दुर्लक्षित करण्याचे काम ते चांगले करत असतात. मोदी त्यांच्या भाषणावेळी तुमचं लक्ष दुसरीकडे नेत असतात. तसेच, अदानी तुमच्या खिशातील पैसा काढत असतात. जेवढा टॅक्स गौतम अदानी देतात तितका टॅक्स तुम्ही भरत असतात. जीवनाश्यक वस्तूंवरही तुम्ही टॅक्स भरत असतात. 18 टक्के टॅक्स अदानी भरत असून, तितकाच टॅक्स तुम्हीही भरतात. तुमचा पगार 1000 रुपये तर, अदानींचा पगार 1000 कोटी इतका पगार आहे. पंतप्रधानांना सतत प्रसारमाध्यमं लागतात. 24 तास मीडिया पंतप्रधानांना टीव्हीवर दाखवत असते”, अशी टीकाही यावेळी राहुल गांधींनी केली.

- Advertisement -

“मी कन्याकुमारीपासू कश्मीरपर्यंत चाललो. जवळपास 4000 हजार किलोमीटर चाललो. त्यावेळी रस्त्यात माझी हजारो ते लाखो लोकांशी माजी चर्चा झाली. त्यावेळी मी प्रत्येकाला विचारलं तुमची अडचण काय आहे, त्यावेळी प्रत्येकाने बेरोजगारी, महागाई ही आमची अडचण असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. गरीबांची तर या देशात भागिदारीच नाही. पण 24 तास टीव्ही पाहिला तर कधीच आपल्याला बेरोजगारी, महागाई यावर कधीच चर्चा झालेली नाही. शेतकरी, मजदूर कधीच दिसणार नाही, पण बॉलिवूडचे कलाकार दिसतील. शिवाय क्रिकेटर आणि पंतप्रधानही आपल्याला दिसतात. पंतप्रधान कधी समुद्रात पुजा करता दिसतात. त्यावेळी भटजी नाही तर, एकटे पंतप्रधान मोदीच असतात. त्यानंतर समुद्रातून थेट विमानात आपल्याला पंतप्रधान दिसतात”, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : हे मोदींचे नाही तर, अदानींचे सरकार; कॉंग्रेस नेता राहुल गांधींचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -