घरक्राइम वेशांतर करुन अल्पवयीन मुलीचा लॉजमध्ये प्रवेश

 वेशांतर करुन अल्पवयीन मुलीचा लॉजमध्ये प्रवेश

Subscribe
पंचवटीतील एक अल्पवयीन हिंदू मुलगी मुस्लिम मित्रासोबत चक्क बुरखा घालून त्र्यंबक रोडवरील एका लॉजमध्ये गेल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, आधीच्या मित्राने लॉजमध्ये दोघांना पकडले. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या मित्रांना बोलवून घेत तुंबळ हाणामारी केली. ही बाब मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी लॉजच्या आवारात दोन्ही मुलांना समज दिली.  मात्र सामाजिक प्रतिष्ठेपोटी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही.
पंचवटीतील एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलगी खेळाचा नियमित सराव करते. सरावादरम्यान तिची सुरुवातीला एका मुलासोबत ओळख झाली. काही दिवसांनी ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले. दोघे जण एकमेकांशी आपलेपणाने बोलू लागले. मुलीशी मैत्री झाल्याने संबंधित तरुणही आनंदीत होता. मात्र, त्याचा हा आनंद काही दिवसापुरता होता. मुलीने क्लासमधीलच दुसर्‍या मुस्लिम मुलाशी मैत्री केल्याचे त्याला मित्रांकडून समजले. सुरुवातीला त्याला मित्र चेष्टामस्करी करत असल्याचे वाटले.
शहानिशा करण्यासाठी मुलाने मुलीवर वॉच ठेवला असता ती अनेकवेळा या मुलासोबत फिरत असल्याचे दिसून आले. या मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचेही त्याला समजले. त्याच्या सांगण्यावरुन ती बुरखा परिधान करुन चक्क महिरावणी परिसरातील एका लॉजमध्ये गेल्याचे समजले. ही बाब तिच्या आधीच्या मित्राला खटकली. त्याने मित्रांसमवेत लॉज शोधून काढले. त्यावेळी त्याला मैत्रीण बुरख्यामध्ये मुलासोबत आढळली. त्यातून दोघांमध्ये वाद झाले. दोघांनी एकमेकांच्या  मित्रांना बोलवून तुंबळ हाणामारी केली. वाद चिघळल्याने तो थेट मुलीच्या वडिलांपर्यंत गेला. आपली मुलगी बुरखा घालून लॉजमध्ये गेल्याने समजताच त्यांनाही धक्का बसला. त्यांनी तात्काळ लॉजच्या आवारात येत मुलीला ताब्यात घेतले. दोन्ही मुलांना समज देत मुलीला घरी आणले. या प्रकरणाची तक्रार मात्र पोलीसांत करण्यात आली नाही.
खास व्यक्तीसाठी वेशांतर

काही महिन्यांपूर्वी इंदिरानगरमध्ये एका तरुणाने मैत्रिणीला तिच्या घराजवळ भेटण्यासाठी वेशांतर केले होते. बुरख्यामध्ये कोणीही ओळखू शकणार नाही, असे त्याला वाटले होते. मात्र, भलतेच घडले. मैत्रिणीला भेटण्यास त्याने बुरखा परिधान केला होता. बुरख्या आलेल्या मैत्रिणीने त्याला ओळखले होते. दरम्यान, तिच्या एका नातलगाला संशय आला. बुरख्यातील मुलीच्या पायात जेन्स बूट असल्याचे दिसून आले. चौकशीत मुलगीऐवजी मुलगा असल्याचे समोर आले. त्यानंतर त्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली होती. प्रेमासाठी हे वेशांतर केल्याचे कबुली त्याने दिली. हे प्रकरण पोलिसांनी समज देवून परत असे वेशांतर करायचे असे सांगत सोडून दिले होते
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -