घरक्राइमनाशकात चोरट्यांचा सुळसुळाट; तीन दुचाकी लंपास

नाशकात चोरट्यांचा सुळसुळाट; तीन दुचाकी लंपास

Subscribe

नाशिक शहराच्या उपनगरीय परिसरातून तीन दुचाक्या चोरीला गेल्या आहेत. रविराज राजेंद्र भावसार (रा. तिडके कॉलनी) यांची ३० हजारांची दुचाकी (एमएच १५ जीके २२८३) सोमवारी (ता. ८) सकाळी दहा ते अकराच्या सुमारस गंगाघाटावरील यशवंत महाराज पटांगण येथून चोरीला गेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहील दिलीप सौंदाणकर (रा. कॅनडा कॉर्नर) यांची १५ हजारांची मोपेड (एमएच १९ बीएस ०९०८) सोमवारी (ता. ४) दुपारी साडेबारा ते दीडच्या सुमारास व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश कोंडाजी नवले (रा. अश्विननगर, पाथर्डी फाटा) यांची ५० हजारांची मोपेड (एमएच १५ एचबी ०९२०) सोमवारी (ता. ८) मध्यरात्री अज्ञाथ चोरट्यांनी पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईस्क्रिमसाठी पैसे मागितल्याने मारहाण

सातपूर येथील चामुंडानगरमध्ये आईस्क्रिम घेण्यासाठी दिलेले पैसे युवकाने परत मागितले असता, संशयितांनी त्यास बेदम मारहाण केली. जितेंद्र शंकर शिंदे, उज्जवल जितेंद्र शिंदे, यश जितेंद्र शिंदे, साई जितेंद्र शिंदे अशी संशयितांची नावे आहेत. रितेश प्रल्हाद ठाकरे (रा. अशोकनगर, सातपूर) याच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. ९) रात्री अकरा वाजता ही घटना घडली. संशयितांनी हॉकी स्टीकने त्यास मारले. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बनावट क्रमांकाव्दारे फसवणूक

पिकअप चारचाकी वाहनाचे रजिस्ट्रेशन नंबर बदलून त्यावर बनावट नंबर टाकून वाहन बनावट क्रमांकाचे असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित अक्षय शंकर लामखेडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार देविदास ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जाची परतफेड न करता २० लाखांना गंडा

महिलेसमवेत राहत असताना संशयिताने तिच्या नावावर विविध बँका, क्रेडिट कार्ड तसेच, फायनान्स कंपन्यांमधून कर्ज काढले. परंतु त्याची परतफेड न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरत महिलेला तब्बल २० लाख ९ हजार ३२२ रुपयांची फसवणूक केली. मनोज आनंदराव गवई (४२) असे संशयिताचे नाव आहे. रुचिता तुषार कापडणे (रा. जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, मे २०२२ पासून संभाजी चौक परिसरातील साईद्वार अपार्टमेंटमध्ये दोघे एकत्र राहत असताना संशयिताने सदरचा कारनामा केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जुन्या भांडणातून दोघांना मारहाण

सिडकोतील विजयनगरमध्ये संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून दोघांना मारहाण केली. योगेश बाळू लोखंडे (रा. विजयनगर, सिडको) याच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. ९) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारा गाडा ओढण्याच्या कार्यक्रमात सोन्याची पोत लंपास

सातपूर गावात बारा गाडा ओढण्याच्या कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ५१ हजारांची सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली. विजया तुषार पाटील (रा. सातपूर कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता.९) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास गर्दीमध्ये सदरील प्रकार घडला. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चॉपर बाळगणारा गजाआड

चॉपर बाळगून वावरताना एका तरुणाला अटक करण्यात आली. हासिम शरीफ खान (२६, रा. नागसेन नगर, वडाळा नाका) असे संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी (ता. १०) रात्री मोपेडसह चॉपर असा ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत कारवाई केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -