घरदेश-विदेशविमानातील इंधन संपले आणि ते ३७ मिनिटे जीवात जीव नव्हता

विमानातील इंधन संपले आणि ते ३७ मिनिटे जीवात जीव नव्हता

Subscribe

खराब हवामान, विमानातील इंधन संपत आलेले आणि विमान उतरवायचे तर समोरचे काहीच दिसत नव्हते. अशा परिस्थितीत विमानातील ३७० जणांचा जीव टांगणीला लागला होता

खराब हवामान, विमानातील इंधन संपत आलेले आणि विमान उतरवायचे तर समोरचे काहीच दिसत नव्हते. अशा परिस्थितीत विमानातील ३७० जणांचा जीव टांगणीला लागला होता. पण पुढे घडले ते एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असे. वैमानिकाने प्रयत्नांची शर्त करत विमान अखेर विमान सुखरुप विमानतळावर उतरवले. मात्र शेवटची ३७ मिनिटे कोणाच्याच जीवात जीव नव्हता.

अमेरिकेमध्ये गेल्या आठवड्यात फ्लॉरेन्स वादळाने थैमान घातले होते. यावेळी दिल्लीवरून उड्डाण केलेले एअर इंडियाचे विनाथांबा विमान AI 101 न्युयॉर्कजवळ पोहोचले होते. विना थांबा प्लाईट असल्यामुळे विमानात इंधन कमी उरले होते. अशातच इन्स्ट्रमन्ट लैंडिंग सिस्टम (ILS) हे कमी प्रकाशात काम करणारे यंत्र बंद पडले. विमान उतरवण्यासाठी हवामानही खराब होते. त्यामुळे कॅप्टन पालिया आणि सिंह यांना विमान उतरविण्याचा निर्णय रद्द करावा लागला. विमान कमी इंधनावरच हवेत घिरट्या घालू लागले.

- Advertisement -

जेकेएफ विमानतळावर AI 101 च्या विमानाअगोदर दुसरे विमान उतरणार होते. कॉकपीटने इशारा दिला. यामुळे विमानाने पहिली घिरटी घातली. दुसर्‍या प्रयत्नावेळी विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विमानातील प्रणालीचील बिघाडामुळे अन्य उपकरणेही बंद होऊ लागली. कॅप्टन पालिया आणि सिंह यांनी नियंत्रण कक्षाला न घाबरता विमान बिघडल्याचे सांगितले. यामुळे पुढे ही उपकरणे नीट होतील का याबाबत शंकाही व्यक्त केली. नियंत्रकाने त्यांना मार्गदर्शन केले. त्याने अ‍ॅटोलँडचा पर्याय निवडण्यास सांगितले. मात्र, विमानाचे दोन्ही रेडियो अल्टीमीटर बंद पडले होते. यामुळे वैमानिकांनी नकार दिला.

 ट्रैफिक कोलिजन अवॉइडेंस सिस्टमही बंद पडल्याने दिसत नसताना विमान उतरवणे धोक्याचे असल्याचे सांगितले. तसेच दुसर्‍या सुरक्षित धावपट्टीचा पर्याय देण्यास सांगितले. यावेळी नेवार्क, बोस्टन, लोगान, वॉशिंग्टन, डलास सारख्या जवळच्या विमानतळांचाही पर्याय सुचविण्यात आला. मात्र, तेवढे इंधन विमानात नव्हते. एटीसीने विमानात किती वेळासाठी इंधन उरल्याचे विचारले. तेव्हाच नेवार्कच्या विमानतळावरील वातावरण निवळायला लागले. यामुळे एटीसीने नेवार्कला विमान नेण्यास सांगितले. तसे विमान नेवार्ककडे वळले. विमानात यावेळी 7200 किलो इंधन होते. 14 तासांच्या उड्डाणानंतर एवढे इंधन राहिले होते. या दीड तासांच्या हवेतील थरारक कसरतींनंतर विमान शेवटी पायलटांनी मोठ्या कौशल्याने नेवार्कला सुखरुप उतरविले. विमानात आणखी दोन पायलटही होते. एअर इंडियाने एवढ्या कठीण परिस्थितीत धैर्य दाखविल्याबद्दल चारही पायलटांचे आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -