घरताज्या घडामोडीAmbani security scare : अनिल देशमुख- पवारांमध्ये दिल्लीत दोन मुद्द्यांवर चर्चा, राजीनाम्यावर...

Ambani security scare : अनिल देशमुख- पवारांमध्ये दिल्लीत दोन मुद्द्यांवर चर्चा, राजीनाम्यावर दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Subscribe

मी आज सकाळी दिल्लीत ऱाष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. भेटीचे कारण म्हणजे विदर्भातील मिहान प्रकल्पासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी मी पवारांची भेट घेतली. त्याचवेळी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांबाबतही शरद पवारांनी माहिती घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. एनआयए आणि एटीएसला राज्य सरकार संपुर्ण सहकार्य करत असल्याचे माहिती त्यांनी पवारांना दिली. राज्य सरकार या संपुर्ण प्रकरणात लक्ष्य घालून आहेत. तसेच या प्रकरणात दोषींवर योग्य कारवाई करेल. कोणत्याही दोषीला सोडल जाणार नाही असे अनिल देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणात दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात जे काही निष्पन्न होईल त्यावर राज्य सरकार कारवाई करेलच असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. ठाकरे सरकारमध्ये सचिन वाझे प्रकरणावर अनिल देशमुख यांच्याबाबतीत असणाऱ्या नाराजीवरही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दिल्लीत देशमुख यांना विचारले असता त्यांनी अतिशय सूचक अशी प्रतिक्रिया या संपुर्ण प्रकरणावर दिली. (Ambani security scare, Maharashtra home minister anil deshmukh meets ncp chief sharad pawar, keep mum on resignation issue)

कोणत्या दोन मुद्द्यावर झाली चर्चा

अनिल देशमुख यांनी दिल्लीत शरद पवार यांच्या भेटीचे कारण प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामध्ये दोन मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीमध्ये इंडस्ट्रीज विभागाकडून मिहान प्रकल्पाच्या निमित्ताने काही आंतरराष्ट्रीय कंपन्या विदर्भात येऊ पाहत आहेत. म्हणूनच या विषयावर अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी मी पवार साहेबांची भेट घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अनेक तालुके आणि जिल्ह्यात अॅन्सेलरी उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच केंद्राच्या उद्योग विभागाची कशी मदत मिळवता येईल हा भेटीचा उद्देश होता. मिहान प्रकल्पाचे डिटेल्स पवार साहेबांना दिले, मोठी इंडस्ट्री विदर्भात येऊ शकेल यासाठीचे मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणावरही शरद पवार यांनी तपासाची माहिती यावेळी घेतली असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये एनआयए आणि एटीएस सर्व घटनांचा तपास करत आहे, एनआयएला आणि एटीएसला राज्य शासनाचे सहकार्य करत असल्याचे मी विभागाची मंत्री म्हणून सांगितल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाच्या माध्यमातून संपुर्ण सहकार्य या प्रकरणात दोन्ही यंत्रणांना होत आहे. पण तपास जोवर पुर्ण होत नाही, तोवर काही सांगता येणार नाही. तपासात ज्या गोष्टी समोर येतील त्यावर पुढील कारवाई राज्य शासन करेल, असेही अनिल देशमुख म्हणाले.

राजीनाम्यावर सूचक प्रतिक्रिया

अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री म्हणून कारभारावर वरिष्ठांची नाराजी आहे. त्यामुळेच अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला जाणार का ? असा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई पोलिस आयुक्तपदी असलेले परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर अनिल देशमुख यांची गच्छंती होणार अशी चर्चा रंगलेली असतानाच अनिल देशमुख यांनी अतिशय सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी वरिष्ठांच्या नाराजीचा प्रश्न विचारताना अनिल देशमुख यांनी या प्रश्नावर गप्प राहणे पसंत केले. तसेच कोणतीही प्रतिक्रिया न देता ते माध्यमांशी या विषयावर काहीच न बोलता निघून गेले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -