घरताज्या घडामोडीकोरोना वाढतोय, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

कोरोना वाढतोय, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Subscribe

कोरोनाचा धोका पुन्हा वाढलेला आहेच. किंबहूना सप्टेंबरमध्ये सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पार गेला आहे. पुन्हा लॉकडाऊन करणं हा एक मार्ग आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लॉकडाऊन संदर्भात भाष्य केलं.

कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करणं हा एक मार्ग दिसतोय. मात्र, जनतेने त्याकाळी जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य आता करतील अशी अपेक्षा आहे. माझी जनता नक्की सहकार्य करणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. जेव्हा सुरुवातीला कोरोना आला तेव्हा काही नव्हतं. आता लस आली आहे. स्वत:हून पुढे येऊन कोरोना लस घ्यावी, यानंतरही मास्क वापरावा. कोरोना लस कुठेही कमी पडणार नाहीत, संपूर्ण राज्यात लसीकरणाची केंद्र उघडली आहे. काही ठिकाणी केंद्र वाढवली आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राज्य शासनाच्या कोरोनासंदर्भात नव्या सूचना

  • राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी संख्या ठेवा
  • नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के संख्या असावी
  • आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आलं
  • सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे
  • धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही.
Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -