घरदेश-विदेशश्रीमंत बिल्डर्सच्या यादीत लोढांचा पहिला नंबर!!

श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत लोढांचा पहिला नंबर!!

Subscribe

देशातील श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत मंगलप्रभात लोढा पहिल्या क्रमांकावर आहेत. मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती ही २७ हजार १५० कोटी ऐवढी आहे.

देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर कोण? याचा विचार केव्हा तुमच्या मनात येतो? किंवा तुम्ही देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर कोण? याचा केव्हा विचार केला आहे? तर, याप्रश्नाचं उत्तर आहे मंगलप्रभात लोढा. होय! मंगलप्रभात लोढा देशातील सर्वात श्रीमंत बिल्डरांच्या यादीत अव्वल ठरले आहेत. GROHE हरून इंडिया रिअल इस्टेटनं देशातील श्रीमंत बिल्डरची यादी जाहीर केली आहे. यामध्ये २७ हजार १५० कोटी रूपयांसह मंगलप्रभात लोढा यांनी देशातील श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. मलबार हिल परिसरातून मंगलप्रभात लोढा हे भाजपचे आमदार आहेत. गेल्यावर्षी अर्थात २०१७ साली मंगलप्रभात लोढा हे श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. त्यावेळी त्यांची मालमत्ता ही १८ हजार ६१० कोटी रूपये होती. १९९५ पासून मंगलप्रभात लोढा हे भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून येत आहेत. देशातील श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत एम्बी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट जितेंद्र वीरवानी. जितेंद्र वीरवानी यांची संपत्ती २३ हजार १६० कोटी आहे. गेल्यावर्षी वीरवानी हे तिसऱ्या स्थानावर होते. त्यावेळी त्यांची संपत्ती १६ हजार ७०० कोटी होती.

देशातील श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत DLFचे प्रमोटर राजीव सिंग. राजीव सिंग यांची संपत्ती १७ हजार ६९० कोटी रूपये आहे. राजीव सिंग यांचे वडिल के. पी. सिंग २०१७ साली अव्वल स्थानी होते. त्यावेळी त्यांची संपत्ती ही २३ हजार ४६० कोटी रूपये होती. मात्र, एनआरसीमध्ये बांधकाम व्यवसायाला उतरती कळा लागली आणि त्याचा फटका हा के. पी. सिंग यांना बसला. पण, या साऱ्या घडामोडींमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे के. पी. सिंग यांची कन्या रेणुका तलवार २७८० कोटीच्या मालमत्तेसह महिला बिल्डरांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. देशातील १०० बिल्डर्सची मालमत्ता ही २ लाख ३६ हजार ६१० कोटी रूपये एवढी आहे. त्यामध्ये मुंबईतील ३५, दिल्लीतील २२ आणि बंगळूरूमधील २१ बिल्डर्सचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -