घरदेश-विदेशमनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली देताना बिग बी झाले भावून

मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली देताना बिग बी झाले भावून

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिवंगत नेते मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाल्यानंतर पूर्ण देशात शोककळा पसरली आहे. पर्रिकरांच्या निधनानंतर त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. श्रद्धांजली वाहतांना बिग बी भावूक झाले असल्याचे म्हटले आहे. मागील काही काळापासून पर्रिकर हे कर्करोगाने ग्रासले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच काल सायंकाळी त्यांचे निधन झाले. मनोहर पर्रिकरांचे निधन झाल्याचे ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले होते. यानंतर त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी श्रद्धांजली वाहिल्या.

- Advertisement -

काय म्हणाले बच्चन

“गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन..एक सौम्य स्वभावाचे व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीने आपल्या दुर्धर आजाराशी अनेक वेळ लढा दिला. त्यांच्या सोबत मी काही काळ घालवला.. त्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य असायचे.. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले.” – अमिताभ बच्चन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -