घरदेश-विदेशGold Silver Price: सोनं-चांदीच्या वायद्यात पुन्हा उसळी, दोन महिन्यांत ५ हजार रूपयांनी...

Gold Silver Price: सोनं-चांदीच्या वायद्यात पुन्हा उसळी, दोन महिन्यांत ५ हजार रूपयांनी सोनं झळाळलं

Subscribe

आज भारतीय बाजारात सोने-चांदीच्या वायद्याच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा 0.4 टक्क्यांनी वाढून 49 हजार 049 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा वायदा 0.7 टक्क्यांनी वाढून 72 हजार 622 रुपये प्रति किलो झाला. मागील काही दिवसातील व्यवहारात सोन्याचे भाव 0.62 टक्क्यांनी व चांदी 0.51 टक्क्यांनी वधारले होते. मार्च महिन्यात भारतातील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम साधारण 44 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. या किंमतींमध्ये नुकतीच सुधारणा झालेली पाहायला मिळत असली तरी सोन्याचे दर गेल्या वर्षीच्या उच्चांक किंमतीपेक्षा 56 हजार 200 रुपयांच्या खाली आहेत. यामुळे दोन महिन्यांत 5 हजार रूपयांनी सोन्याला झळाळली प्राप्त झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 0.4 टक्क्यांनी वाढून 1,906.16 डॉलर इतका होता. यासह इतर मौल्यवान धातूंपैकी चांदी प्रति औंस 27.99 डॉलर तर प्लॅटिनम 0.8 टक्क्यांनी वधारून 1,200.69 डॉलर इतका होता. सोन्याच्या व्यापाऱ्यांना या आठवड्याच्या शेवटी जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या सुरुवातीच्या बेरोजगारीच्या दाव्यांची, जीडीपीची प्रतीक्षा असते. आशियाई इक्विटी बाजार आज मोठ्या प्रमाणात उच्च स्तरावर होते. तर बिटकॉईन $ 40 हजारावर पोहोचला होता.

- Advertisement -

सरकारने नागरिकांना स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली आहे. निवेशक सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत गुंतवणूकदार बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करू शकतात. ही योजना केवळ 24 मे ते 28 मे या 5 दिवसांसाठी खुली असणार आहे. या योजनेंतर्गत तुम्ही 4 हजार 842 रुपये प्रति ग्रॅम सोनं खरेदी करू शकता. या योजनेत जर तुम्ही 10 ग्रॅम सोनं विकत घेतले तर त्याची किंमत 48 हजार 420 रुपये आहे आणि जर सोन्याचा बॉन्ड ऑनलाईन खरेदी केला तर अशा गुंतवणूकदारांना सरकार 50 रुपये प्रति ग्रॅम अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. ऑनलाइन सोने खरेदीसाठी गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम सोन्याचे 4,792 रुपये मोजावे लागणार आहे. या प्रकरणात तुम्हाला 10 ग्रॅम सोने 47,920 रुपयांमध्ये मिळणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -