घरमनोरंजन'शब्द माहिती असता तर एडिट केला असता', युविकाच्या चौधरीच्या माफीनंतर पती प्रिन्सने...

‘शब्द माहिती असता तर एडिट केला असता’, युविकाच्या चौधरीच्या माफीनंतर पती प्रिन्सने मागितली माफी

Subscribe

अभिनेत्री युविका चौधरी एका व्हिडिओमुळे चांगलीच अडचणीत सापडली आहे. त्या व्हि़डिओमध्ये युविकाने जातीवादी अपशब्दाचा वापर केला आहे. सध्या सोशल मीडियावर युविकाला अटक करण्याची मागणी जोर धरतेयं. सोशल मीडियावरून अनेक युजर्स आता युविकाला जातीवादी शब्दामुळे ट्रोल करु लागले आहेत. या सोशल मीडियावर जोर धरणारी अटकेची मागणी ऐकून युविका चौधरी चिंताग्रस्त झाली आहे. यानंतर तिने तातडीने एक पोस्ट शेअर करुन सर्वांची माफी मागितली आहे.

युविकाच्या या पोस्टनंतर अनेक सेलेब्स तिच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. युविकाच्या पोस्टवर तिचा नवरा प्रिन्स नरुला यांने देखील कमेंट केली की, ‘चुकून झालेली चूक आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे आणि तू क्षमा मागितली आहे, म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम करतो.’ प्रिन्स नरुला सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे. परंतु ट्रोलर्सने प्रिन्स नेरुलावरही आपला राग व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

- Advertisement -

युविकाप्रमाणे पती प्रिन्स नेरुलाही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतो. युविकाने जातीवादी शब्दाचा वापर केलेल्या व्हिडिओमध्येही प्रिन्स तिच्यासोबत दिसतोय. त्यामुळे अडचणीत आलेल्या पत्नी युविकाला सपोर्ट करण्यासाठी त्यानेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रिन्स माफी मागत सांगतोय की, ‘जर चुकी युविकाची असेल तर मी पण त्यावेळी तिथे होतो. मी पण याला जबाबदार आहे’

- Advertisement -

युविकाच्या समर्थनार्थ पती प्रिन्स सरसावला

यावर भली मोठी व्हिडिओ शेअर करत प्रिन्स सांगतो की, “सर्वांना हॅलो, हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांचे त्या शब्दामुळे मन दुखावले. जो शब्द युविकाने वापरा, खरचं सांगतो, हे सर्व जाणूनबुजून नाही केले. आम्हाला त्या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. कारण मी पण युविकासोबत होतो. जर युवीची चुकी असेल तर ती माझी पण चुकी आहे. आम्हा दोघांना त्या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. आम्ही दोघांनाही माफी मागण्याचे पात्र आहोत. जर आमचामुळे कोणाला हर्ट झाले असेल तर तर आम्ही तुमची माफी मागतो. आम्ही कास्टवर विश्वास ठेवणारे लोकं आहोत. मी हेटर्सला सांगू इच्छितो की, ते संधीच शोधत असतात की, आमच्या तोंडातून असे काही बोलले जावे ज्यातून त्यांना आम्हाला ट्रोल करता यावे. तुम्ही तुमच्य घरातल्यांना या जागेवर प्लीज ठेवून बघा.”

प्रिन्स यावर थांबला नाही तर तो पुढे सांगतो, “आम्ही हा व्हिडिओ जाणूनबुजून नाही केला. आम्हाला जर त्या शब्दाचा अर्थ माहित असता तर तो व्हिडिओ आम्ही एडिट करुन टाकलाच नसता किंवा युवीलाही मी थांबवले असते. फक्त एक मिसअंडस्टँडिंग झाली आहे. ”

युविकाने मागितली माफी

युविकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिले, ‘हाय फ्रेंड्स, मी माझ्या शेवटच्या व्लॉगमध्ये वापरलेल्या शब्दाचा अर्थ मला माहित नव्हता. मला कुणालाही दुखवायचं नव्हतं किंवा मी हे असं काही करु इच्छित नाही. मी तुम्हा सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त करते. आशा आहे की, आपणा सर्वांना समजले असेल. तुम्हा सगळ्यांवर खूप खूप प्रेम.’

युविका चौधरीची पोस्ट

युविकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तिचा पती प्रिन्स नरुला केस कापून घेताना दिसत असून, अंगावर कापड घेऊन बसला आहे. तर, युविका घरभर फिरून एक व्हिडीओ बनवत आहे. व्हिडीओ बनवताना युविका म्हणते की, ‘जेव्हा जेव्हा मी व्लॉग बनवते, तेव्हा मी येऊन ** सारखी का उभी राहते? मला स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. मी खूप बेकार दिसत आहे आणि प्रिन्स मला तयार होण्यास वेळ देत नाही.’

युविकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि #ArrestYuvikaChodhhary ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. बरेच लोक युविकावर मीम्स शेअर करत होते. तर ट्रोलर्स युविकाला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यापूर्वी तार मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील बबिता जीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता देखील आपल्या जातीवादी अपमानास्पद शब्द वापरलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली होती.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -