घरदेश-विदेशराजकीय संघर्ष वाढला... भाजप कार्यालयावर मध्यरात्री पेट्रोल बॉम्बचा हल्ला; एकाला अटक

राजकीय संघर्ष वाढला… भाजप कार्यालयावर मध्यरात्री पेट्रोल बॉम्बचा हल्ला; एकाला अटक

Subscribe

या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जमून कारवाईची मागणी केली.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरु झाली आहे. यातच देशातील राजकीय संघर्ष वाढीला देखील सुरुवात झालीय, त्यामुळे निवडणुकींमध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.याचदरम्यान चेन्नईतील भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या हल्ल्यामुळे परिसरात एकचं खळबळ उडाली आहे. तामिळनाडू येथील भाजप कार्यालयावर एका अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री 1 वाजता पेट्रोल बॉम्ब टाकल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

- Advertisement -

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणी पोलिसांनी चेन्नईतील नंदनम येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. विनोद असे आरोपीचे नाव असून त्याची पोलीस चौकशी करत आहेत.

- Advertisement -

यावर भाजप नेते कराटे त्यागराजन यांनी सांगितले की, दुपारी 1.30 च्या सुमारास आमच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. या 15 वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती. ज्यामध्ये डीएमके पक्षाचा हात होता. या घटनेमुळे तामिळनाडू सरकारचा आम्ही निषेध करतो. याप्रककरणाची माहिती पोलिसांना दिली असून भाजपा कार्यकर्ते अशा घटनांना घाबरत नाहीत असेही ते म्हणाले.

या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जमून कारवाईची मागणी केली.


Ban on Import of Drones : देशात ड्रोन आयातीवर केंद्राची बंदी, या कारणासाठी मिळणार सूट


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -