घरदेश-विदेश#Me Too : एम. जे. अकबर ३१ ऑक्टोबरला नोंदवणार जबाब

#Me Too : एम. जे. अकबर ३१ ऑक्टोबरला नोंदवणार जबाब

Subscribe

लैंगिक शोषणाचे आरोप असलेले माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांचा ३१ ऑक्टोबर रोजी जबाब नोंदवण्यात येणार आहे. या आरोपानंतर अकबर यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे.  अकबर यांचा ३१ ऑक्टोबर रोजी जबाब नोंदवण्यात येणार आहे. अकबर यांच्यावर २० पेक्षा जास्त महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांना परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परत बोलावण्यात आलं. त्यानंतर गुरूवारी एम. जे. अकबर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान या प्रकरणामध्ये एम. जे. अकबर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून त्याप्रकरणी आता ३१ ऑक्टोबर रोजी एम. जे. अकबर यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. पत्रकारांनी केलेल्या आरोपनंतर माझी ४० वर्षाची कारकीर्द कलंकीत झाल्याचं एम. जे. अकबर यांनी म्हणत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

वाचा – एम. जे. अकबरांच्या राजीनाम्याची ‘आतली बातमी’

अकबर यांचा राजीनामा

दरम्यान न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आपण राजानीमा दिल्याचे एम. जे. अकबर यांनी म्हटले आहे. पण, वास्तव मात्र वेगळेच आहे. अकबर यांच्यामागे मोठा असा जनाधार नाही. शिवाय, अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे हिंदी भाषिक प्रदेशामध्ये आगामी निवडणुकीच्या काळात भाजपला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्याच मुद्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील एम. जे. अकबर त्यानंतर अमित शहा यांची भेट घेतली होती. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील एम. जे. अकबर यांच्यावर नाराज असल्याची माहिती आता पुढे येत आहे. दुसरीकडे शबरीमाला मंदिर प्रवेशाचा मुद्दा देखील सध्या गाजत आहे. या सर्व घडामोडींवर एम. जे. अकबर यांच्यावर होणारे आरोप भाजपची डोकेदुखी वाढवणारी ठरणारी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर देखील परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता एम. जे. एकबर यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेल्याची चर्चा आहे.

वाचा – #MeToo : एम जे अकबर यांचा अखेर राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -