Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र I.N.D.I.A.आणि राज्यातील NDAच्या एकाच दिवशी मुंबईत बैठका; महायुतीचा अजेंडा काय?

I.N.D.I.A.आणि राज्यातील NDAच्या एकाच दिवशी मुंबईत बैठका; महायुतीचा अजेंडा काय?

Subscribe

राज्यातील NDA युतीचीदेखील बैठक होणार आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. INDIA आघाडीची बैठक मुंबईत आयोजित असताना आता NDAने देखील त्याच दिवशी बैठक घेत असल्यानं राज्यातील महायुतीचा नेमका अजेंडा काय? यावर आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. सत्ताधारी भाजपला हरवण्यासाठी देशपातळीवरील बहुतांश विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. त्यांच्या INDIA नावाच्या आघाडीची बैठक 31 आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार, याच दिवशी राज्यातील NDA युतीचीदेखील बैठक होणार आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. INDIA आघाडीची बैठक मुंबईत आयोजित असताना आता NDAने देखील त्याच दिवशी बैठक घेत असल्यानं राज्यातील महायुतीचा नेमका अजेंडा काय? यावर आता तर्क-वितर्क लावले जात आहेत. याआधी देखील विरोधकांची जेव्हा बंगळुरूत बैठक होत होती, त्याचेवेळी NDAची दिल्लीत बैठक घेण्यात आली होती. (Maharashtra Politics Meetings of INDIA and NDA in the state in Mumbai on the same day What is the agenda of the MahaYuti )

NDA च्या बैठकीत कोणाची उपस्थिती?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मंगळवारी 29 ऑगस्टला ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

महायुतीच्या वतीनं राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारी इंडिया आघाडीची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक होत आहे. महायुतीची बैठक वरळीच्या डोम सभागृहात होणार आहे. यामुळेच दोन्ही दिवस बैठकांचं सत्र असणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला एकतर्फी प्रसिद्धी मिळू नये, तसंच इंडिया बैठकीवरून लक्ष विचलित करण्याकरता महायुतीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं काही काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे.

महायुतीच्या बैठकीत राज्यातील सर्व 48 मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार , तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष व काही ठराविक नेतेमंडळींना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. सर्व 48 मतदारसंघांमधील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेतला जाईल.

- Advertisement -

(हेही वाचा: राज ठाकरेंचे राजकारणातील महत्त्व वाढले? दोन गटांचे आमदार पोहोचले ‘शिवतीर्थ’वर )

शेकापचं जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखालील 13 छोटे-मोठे पक्ष आणि सामाजिक संघटनांना समावेश असलेला प्रागतिक विकास मंच मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीमध्ये सामील होणार आहे. त्याचवेळी एनडीच्या बैठकीत सहभागी 38 पक्षांपैकी चार पक्ष विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीय पद्धतीनं स्वागत करण्यात येणार आहे.

- Advertisment -