घरदेश-विदेशModi in Varanasi : पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर; गंगा आरती, काशी विश्वनाथ...

Modi in Varanasi : पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर; गंगा आरती, काशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्घाटन, असा असेल मोदींचा दौरा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर येणार आहेत. १३ आणि १४ डिसेंबरला पंतप्रधान मोदी काशीमध्ये ३० तासांच्या मुक्कामावर असतील, यात १३ डिसेंबरला म्हणजे आज पंतप्रधान मोदी ११ वाजता काशीला पोहचतील. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदी बेन आणि इतर लोकप्रतिनिधी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल होतील.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावरुन हेलिकॉप्टरने संपूर्णानंद मैदानावर येणार आहे. तेथून बाबा कालभैरवाच्या दर्शनासाठी रवाना होतील. बाबा काल भैरवाचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी खिरकीया घाटावर जाणार आहेत. त्यानंतर क्रूझमधून दुपारी १.३० वाजता विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये प्रवेश करतील.

- Advertisement -

बाबांच्या दर्शनानंतर १.५० वाजता विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान बरेका गेस्ट हाऊसमध्ये पोहोचतील. त्यानंतर संध्याकाळी रो-रो बोटीने गंगा आरतीमध्ये सहभागी होतील. यावेळी सर्व नेते सकाळी ५.३० गंगा आरतीला उपस्थित राहणार आहेत. आरतीनंतर पंतप्रधान पुन्हा बरेका येथे जातील.

- Advertisement -

१४ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत परिषद

१४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता पंतप्रधान मोदी काशी वाराणसी महानगर आणि भाजप संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत औपचारिक बैठक घेतील. बरेका प्रशासकीय इमारतीत १०.०० वाजता मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास ४ तास ही बैठक होणार आहे. यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यांची विकास कामे आणि पुढील योजना मांडतील.

दुपारी २.३० वाजता बैठकीतून बाहेर पडताच पंतप्रधान मोदी ३ वाजता स्वर्वेद मंदिराला भेट देतील. स्वर्वेद मंदिरात दीड तास पंतप्रधानांचा कार्यक्रम होणार आहे. येथे अनुयायांना संबोधित करतील. यंदा स्वर्वेद मंदिरात ९८ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. पंतप्रधान मोदी दुपारी ४.३० वाजता स्वर्वेद मंदिर उमराण येथून दिल्लीला रवाना होतील.

या मंदिराचे धाममध्ये रूपांतर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काशी विश्वनाथ कॉरिडॉरबद्दल म्हणतात की, हे मंदिर एक धाम बनेल , १००० वर्षांनंतर या मंदिराचे धाममध्ये रूपांतर होईल. यात १००० वर्षांपूर्वी गंगा मातेची जी इच्छा होती, ती इच्छा आता पूर्ण होत आहे. आई गंगा मणिकर्णिकामध्ये अडकू इच्छित नाही.

अभिमानाचा दिवस

मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “उद्याचा दिवस भारतीय संस्कृतीसाठी खूप अभिमानाचा दिवस असेल. जगातील प्राचीन शहर, आध्यात्मिक उर्जेचा अक्षय स्रोत, बाबा विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मोक्षदायिनी काशीमध्ये श्री काशी विश्वनाथ धामच्या भव्य स्वरूपाचे उद्घाटन करतील.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -