घरक्रीडाकबड्डी : विजेता खेळाडू वेगळा अन् सत्कार दुसऱ्याचाच; मध्य प्रदेशातील अजब घटना

कबड्डी : विजेता खेळाडू वेगळा अन् सत्कार दुसऱ्याचाच; मध्य प्रदेशातील अजब घटना

Subscribe

कबड्डी खेळणाऱ्या एका खेळाडूने आपण जिंकलो असे सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांसह माजी मंत्र्यांसह आमदार आणि गावकऱ्यांनी त्याचे कौतुक केले. मात्र खरा विजेचा दुसऱ्याच असल्याचे समजल्यावर एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे खोटा विजय सांगणाऱ्या खेळाडूविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

कबड्डी खेळणाऱ्या एका खेळाडूने आपण जिंकलो असे सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांसह माजी मंत्र्यांसह आमदार आणि गावकऱ्यांनी त्याचे कौतुक केले. मात्र खरा विजेचा दुसऱ्याच असल्याचे समजल्यावर एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे खोटा विजय सांगणाऱ्या खेळाडूविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील रुसा गावात ही घटना घडली आहे. (mp mla collectors congratulations and festive atmosphere but the story of kabaddi star turned out to be false)

नेमकी घटना काय?

- Advertisement -

मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील रुसा गावात जल्लोषाचे वातावरण होते. गावातील युवक सचिन कुशरामचा जागतिक ज्युनियर कबड्डी विजेत्या संघात समावेश होता, सचिन गावात पोहोचला असता माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार ओंकार मरकाम आणि क्रीडा विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याचे स्वागत केले. जिल्हाधिकारी कार्यालयातूनही अभिनंदनाचा वर्षाव झाला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही.

क्रिकेटचे वेड असलेल्या देशात कबड्डीला फारशी पसंती नाही. पण तुमचा मुलगा जेव्हा मोठी कामगिरी करतो, तेव्हा कुटुंबीयांपासून सर्वांनाच अभिमान आणि आनंद वाटतो. अशीच काहीशी एक बातमी आदिवासीबहुल दिंडोरीसाठी एक खास होती. कारण जिल्ह्यातील रुसा गावातील सचिन कुशराम यांचा मुलगा पदक घेऊन परतल्याची बातमी आली होती. त्यावेळी नेते आणि अधिकाऱ्यांनी त्याचे स्वागत केले. राजकीय नेतेमंडळींनी स्वागत केल्याने सचिन यानेही मोठ्या थाटात प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. त्यावेळी “आम्ही इराणला गेलो, तिथल्या विश्वचषक स्पर्धेत पहिले पारितोषिक जिंकले, खूप आनंद वाटतो”, असे सचिन कुशराम म्हणाला.

- Advertisement -

सचिन कुशरामच्या सांगण्यावरून सर्वत्र बातम्या पसरल्या. या बातम्या दिंडोरीचा खेळाडू अभिनव कटारे यानेही वाचल्या. त्यावेळी अभिनव कटारे याला संशय आला. त्यावेळी “मी सर्व तपासणी केली असून यादी पाहिली, वर्तमानपत्रातील फोटोची तुलना केली असता समजले की, सचिनने त्याच्या शिक्षक वडिलांना पाठवलेले चित्र हे योगेश दहियाचे आहे”, असे अभिनव कटारे सांगितले. त्यानंतर याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

यूट्यूबवर मॅच पाहिली पण खेळाडू दिसला नाही

“यूट्यूबवर मॅच पाहिली पण सचिन दिसला नाही, AKFI वेबसाईटवर प्रत्येक राज्यातील खेळाडूंचे फोटो आहेत मात्र सचिन नाही. तेव्हा संशय आला की, योगेश दहियाच्या फोटोची छेडछाड करण्यात आली आहे” असेही अभिनव कटारे म्हणाला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘तक्रार मिळाली असून ही बातमी खोटी आहे की नाही, हे तपासानंतर कळेल’, असे एसपी अभिनव सिन्हा यांनी सांगितले.

दरम्यान, इराणच्या उर्मिया शहरात 26 फेब्रुवारी ते 5 मार्च 2023 दरम्यान जागतिक ज्युनियर कबड्डी चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते.


हेही वाचा – IPL 2023: चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना सुरू होण्याआधीच आले पोलीस; वाचा नेमके प्रकरण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -