घरक्रीडाIPL 2023: चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना सुरू होण्याआधीच आले पोलीस; वाचा नेमके प्रकरण...

IPL 2023: चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना सुरू होण्याआधीच आले पोलीस; वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या हंगामातील आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या हंगामातील आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. परंतु, हा सामना सुरू होण्यापूर्वीच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पोलीसांना बोलवण्यात आले. कारण स्टेडियमबाहेर चाहत्यांनी मोठ्याप्रमाणात गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. (ipl 2023 tickets for rcb vs csk match were sold without opening the counter fans created ruckus at chinnaswamy stadium)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

आयपीएलच्या 16 हंगामातील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या लढतीत भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली हे दोन एकमेकांविरोधात लढणार आहेत. ही लढत पाहण्यासाठी दोन्ही बाजूच्या चाहत्यांकडून मोठी गर्दी केली जात आहे. पण लढतीसाठी आलेल्या चाहत्यांना सामन्याचे एकही तिकिट मिळाले नाही. त्यामुळे सामन्याची तिकिटे मिळवण्यासाठी 48 तास आधी आलेल्या चाहत्यांनी स्टेडीयमबाहेर राडा केला.

शनिवारी बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि त्यानंतर चाहत्यांनी तिकीट घरासमोर मोठी रांग लावली. तिकीटांची विक्री रविवारपासून सुरु होणार होती. मात्र चाहत्यांनी शनिवारीच रांग लावण्यास सुरुवात केली. पण बेंगळुरू संघाने सोशल मीडियावर माहिती दिली की. बंगळुरू आणि चेन्नई या सामन्याच्या सर्व ऑनलाइन आणि ऑफ लाइन तिकिटांची विक्री झाली आहे. हे कळताच चाहत्यांनी एकच गोंधळ सुरू केला.

- Advertisement -

तिकीट का मिळत नाहीत यावरून संतप्त झालेल्या चाहत्यांना रोखण्यासाठी अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी सक्तीने चाहत्यांना स्टेडियम परिसरातून बाहेर केले. चाहत्यांचे एकच म्हणणे होते की, अखेर विक्री सुरू होण्याआधीच कशी काय तिकीटे संपली. शनिवारच्या या गोंधळानंतर रविवारी देखील चाहत्यांनी तिकिटासाठी रांग लावली. पण त्यांना निराश होऊन परत जावे लागले.


हेही वाचा – Arjun Tendulkar : अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई इंडियन्सच्या संघातून अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -