घरपालघरउघड्या खदानीच्या पाण्यात शाळकरी मुलगा बुडाला

उघड्या खदानीच्या पाण्यात शाळकरी मुलगा बुडाला

Subscribe

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोणत्याही सुरक्षा उपाययोजना नसलेल्या उघड्यावरील पाणी भरलेल्या खदानी पोहायला जाणार्‍यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत.

बोईसर: शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्याने मौजमज्जा म्हणून जवळच्या खदानीत पोहायला गेलेला अल्पवयीन मुलगा बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोईसर – चिल्हार मार्गावरील खुटल येथील एका उघड्या खदानीच्या पाण्यात आपल्या मित्रांसह पोहायला उतरलेल्या रोहन प्रदीप कवटे वय (१५ वर्षे) या नववीत शिकणारा शाळकरी मुलगा खोल पाण्यात बुडाला असून त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारीच बोईसरजवळील बोरशेती येथील एका शाळकरी विद्यार्थ्याचा माती काढलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून बळी गेला होता.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोणत्याही सुरक्षा उपाययोजना नसलेल्या उघड्यावरील पाणी भरलेल्या खदानी पोहायला जाणार्‍यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत.

पालघर तालुक्यातील खुटल डोंगरमाळ येथे राहणारा रोहन कवटे हा शाळकरी मुलगा उन्हाळी सुट्टी लागल्याने रविवारी संध्याकाळच्या सुमारास जवळच असलेल्या खुटल येथील खदानीच्या पाण्यात मित्रांसमवेत पोहायला गेला होता.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना गौणखनिजासाठी ही खदान खोदण्यात आली होती.काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास १८ वर्षांपासून ही खदान बंद करण्यात आली आहे. २५ ते ३० फूट खोल पाणी असलेली ही खदान सध्या वापरात नसून या खदानीच्या पाण्याचा वापर स्थानिक नागरीक आणि महीला आंघोळीसाठी,गुरांना पाणी पाजण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी करतात.

- Advertisement -

सध्या वाढत्या उन्हाच्या काहिलीने सर्वच जण त्रस्त झाले असून १६ एप्रिलच्या संध्याकाळी रोहन कवटे आणि त्याचे काही मित्र खुटल येथील खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते.खदानीच्या काठावरून पाण्यात उड्या मारत असताना प्रदीप कवटे हा मुलगा अचानक बुडाला.सोबत असलेला आपला मित्र पाण्यात दिसत नसल्याने लक्षात येताच घाबरलेल्या इतर मुलांनी ही बाब कुटुंबीयांना सांगताच गावातील स्थानिक नागरिक आणि मनोर पोलिसांनी रात्री पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र अंधारामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याने शोधकार्य थांबवून सोमवारी सकाळपासून सफाळे येथील सर्पमित्र ग्रुप यांच्या मदतीने पुन्हा एकदा रोहनच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -