घरदेश-विदेशजावई ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर नारायण मूर्ती यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

जावई ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर नारायण मूर्ती यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Subscribe

ऋषी सुनक यांचे शिक्षण इंग्लंडमधील विंचेस्टर आणि नंतर ऑक्सफर्डमधील सर्वात प्रसिद्ध शाळेत झाले.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक (rishi sunak)  हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी ब्रिटनवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील अर्थव्यवस्थेच्या सुधारणांबाबत भाष्य केलं. त्याचबरोबर मी ब्रिटनच्या जनतेचा विश्वास मिळवून येणाऱ्या पिढीचं भविष्य सुरक्षित राहील यासाठी काम कारेन असं ऋषी सुनकी म्हणाले. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यांनतर त्यांचे सासरे नारायण मूर्ती (narayan murthy) यांनीही ऋषी सुनक यांना शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा –  माझं सरकार अशी अर्थव्यवस्था तयार करेल… पंतप्रधान सुनक यांनी ब्रिटनवासीयांना केले आश्वस्त

- Advertisement -

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांचे जावई ऋषी सुनक यांना ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यांनतर पहिली प्रतिक्रिया दिली दाते म्हणले. “आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि त्यांनी आणखी यश संपादन करावे त्यासाठी आमच्या शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत. “42 वर्षीय ऋषी सुनक यांनी रविवारी कंझर्वेटिव्हला पक्षाच्या नेतृत्वाच्या पदाची शर्यत जिंकली आणि आता ते भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान झाले आहेत. यावरच प्रतिक्रिया देत नारायण मूर्ती म्हणाले, “अभिनंदन ऋषी. आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि आम्ही तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”

ऋषी सुनक यांच्या आई फार्मासिस्ट आहेत तर त्यांचे वडील डॉक्टर आहेत. ऋषी सुनक यांचे शिक्षण इंग्लंडमधील विंचेस्टर आणि नंतर ऑक्सफर्डमधील सर्वात प्रसिद्ध शाळेत झाले. त्यांनी गोल्डमन सॅक्स ग्रुप इंक. येथे तीन वर्षे काम केले आणि नंतर स्टॅनफोर्ड, कॅलिफोर्निया येथून एमबीए केले, जेथे ते इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांना भेटले. ऋषी सुनक यांनी 2009 मध्ये अक्षतासोबत लग्न केले. ऋषी सुनक यांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – गुगलवर पुन्हा एकदा कारवाई; 936 कोटींचा ठोठावला दंड

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -