घरताज्या घडामोडीभारत पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठवण्यास मदत करणार

भारत पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठवण्यास मदत करणार

Subscribe

भारतात पाकिस्तानचे १८० नागरिक आहेत. त्यांनाच मायदेशी पाठवण्याची भारत व्यवस्था करत आहे.

पाकिस्तान या कोरोनाच्या संकटात भारताला जरी मदत करत नसला तरी भारत पाकिस्तानला मदत करण्यास तयार असल्याचं दिसतं आहे. अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यास मदत करण्याच आश्वासन भारताने दिलं आहे. पाकिस्तान सरकारने नवी दिल्लीला सांगितलं आहे की, सध्या १८० नागरिक भारतातील विविध शहरांमध्ये अडकले आहेत. त्यातील काही रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील लोक भारतात उपचारासाठी आले आहेत. भारत या सर्व नागरिकांची माहिती गोळा करीत आहे. लवकरच या सर्वांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची व्यवस्था करणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की, आम्ही सर्व परदेशी नागरिकांची माहिती गोळा करीत आहोत. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांचा देखील समावेश आहे. पाकिस्ताने सांगितलं की, भारतात १८० पाकिस्तानी नागरिक असून त्यांना स्वदेशी परत यायचे आहे. आम्ही सर्व संबंधित संस्थांशी बातचित केली आहे. जेणेकरून हे लोक सुखरूप आपल्या मायदेशी पोहोचतील.

- Advertisement -

सध्या कोरोनाच्या संकट असून पाकिस्तान सैन्य भारतातील तळांवर सतत गोळीबार करत आहे. तरीदेखील भारताने त्यांना मदत करण्याचे ठरविले आहे. दोन दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीर मधील एका गावात झालेल्या गोळीबारात तीन भारतातील नागरिकांचा मृत्यू झाला होता. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या मेरीटाईम सेक्युरिटी एजेंसीने देखील दोन भारतीय मच्छिमारांच्या बोटीवर हल्ला केला. १२ एप्रिल रोजी हा हल्ला करण्यात आला होता. या संदर्भात भारताने नुकतचं नवी दिल्ली येथे पाकिस्तान उच्चायुक्तांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून फटकारले होते. अशा परिस्थितीत देखील भारत पाकिस्तानला मदत करण्यात तयार झाला आहे.


हेही वाचा – CoronaVirus: इटलीत कोरोनाचं सावट, तरी लोकांनी केली वाईन पार्टी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -