घरCORONA UPDATECorona: आर्थिक संकटातील वृत्तसंस्थांना गुगलचा मदतीचा हात!

Corona: आर्थिक संकटातील वृत्तसंस्थांना गुगलचा मदतीचा हात!

Subscribe

जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असून त्यामुळे अनेक उद्योगधंदे आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यात जगभराला कोरोनाची प्रत्येक मिनिटाची माहिती देणारी वृत्त माध्यमं देखील अपवाद नाहीत. या संस्थांमध्ये देखील आर्थिक समस्या उभ्या राहू लागल्या आहेत. अशा संस्थांसाठी आता जगभरातल्या माहितीसाठीचं अग्रगण्य सर्च इंजिन असलेल्या गुगलने मदतीचा हात पुढे केला आहे. वृत्तमाध्यमांना बळ मिळावं, यासाठी गुगलने त्यांना कोविड-१९च्या या संकटाच्या काळात आर्थिक मदत देऊ केली आहे. या संस्थांना त्यांच्या आकार आणि कामाच्या स्वरूपानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे. गुगल न्यूज इनिशिएटिव्हच्या अंतर्गत गुगलने जर्नलिजम इमर्जन्सी रिलीफ फंड तयार केला आहे.

अर्ज करण्यासाठी काय असतील अटी?

या आर्थिक मदतीसाठी गुगलकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित वृत्तप्रकाशक एक वर्षापेक्षा जास्त जुनी असावी. तसेच, त्यांच्याकडे २ ते १०० पत्रकार कर्मचारी असावेत. तसेच, त्यांचा कामाचा मुख्य फोकस हा लाईफस्टाईल, मनोरंजन अशा इतर बातम्या नसून मुख्य बातम्यांवर असावा.

- Advertisement -

ऑनलाईन होणार अर्ज नोंदणी!

१५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये इच्छुक वृत्तमाध्यमांनी ऑनलाईन पद्धतीन या फंडसाठी अर्ज करणं अपेक्षित आहे. त्यानंतर गुगल टीमकडून या अर्जांची छाननी होईल आणि नियमांमध्ये बसणाऱ्या अर्जांना निधी दिला जाईल. १०० पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग असलेल्या कंपन्यांना देखील अर्ज करता येणार आहे. मात्र, त्यांना निधी द्यावा किंवा नाही, याचा निर्णय गुगल त्यांच्या अर्जाच्या छाननीनंतर घेईल, असं देखील गुगलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -